एक्स्प्लोर
एका वर्षातच आयफोन SE निम्म्या किंमतीत उपलब्ध!
मुंबई: अॅपल आयफोन SEच्या किंमतीत बरीच कपात करण्यात आली आहे. गॅझेट 360च्या वेबसाइटवर आयफोन SE 16 जीबी व्हेरिएंट 19,899 रु. किंमतीला लिस्ट करण्यात आला आहे.
लाँचिंगनंतर अवघ्या एका वर्षाच्या आतच आयफोन SE च्या किंमतीत कपात करण्यात आली आहे. अॅपलनं मागील वर्षी हा स्मार्टफोन लाँच केला होता. ज्याची किंमत 39,000 रुपये होती.
आयफोन SE चे फीचर्स:
यामध्ये 4 इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. तर A9 प्रोसेसर आणि M9 मोशन प्रोसेसर देण्यात आला आहे. तर 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा आहे.
यामधील प्रोसेसर चिप ही आयफोन 6S मध्येही वापरण्यात आली आहे. यात वाय-फाय, ब्ल्यूटूथ, LTE कनेक्टिव्हीटी यासारखे ऑप्शन देण्यात आले आहेत.
दरम्यान, अॅपलकडून भारतात आयफोन 5s या फोनच्या किंमतीत लवकरच मोठी कपात केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. चार वर्षांपूर्वी लाँच झालेल्या या फोनची किंमत भारतीय बाजारात 15 हजार रुपये केली जाऊ शकते.
‘इकॉनॉमिक टाईम्स’च्या वृत्तानुसार अॅपलकडून यासोबतच आयफोन SE च्या किंमतीतही कपात केली जाऊ शकते. 5s ची किंमत 15 हजार रुपये असेल, कंपनीच्या ऑनलाईन मार्केटिंगचा हा भाग आहे. अॅपलची भारतात मिड-बजेट स्मार्टफोनवर नजर असेल, ज्यावर सध्या चिनी कंपन्यांचं वर्चस्व आहे, असं कंपनीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
अॅपलच्या सर्व विक्रेत्यांना याबाबत माहिती देण्यात आली आहे. ही ऑफर केवळ ऑनलाईन फोन घेणाऱ्या ग्राहकांसाठी असेल. 5s फोनची सध्याची किंमत 20 हजार रुपये आहे, तो 15 हजार रुपयात मिळेल, असं कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.
संंबंधित बातम्या:
अॅपलची बजेट स्मार्टफोन मार्केटवर नजर, आयफोन 5s 15 हजार रुपयात!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
राजकारण
राजकारण
क्राईम
Advertisement