एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बहुप्रतिक्षीत आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लॉन्च
सॅन फ्रान्सिस्को : अॅपलचे बहुचर्चित आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लस लॉन्च झाले आहेत. अमेरिकेतल्या सॅन फ्रान्सिस्कोच्या ग्राहम सिव्हिक ऑडिटोरियममधील भव्य सोहळ्यात कंपनीचे सीईओ टीम कूक यांनी या फोनचं अनावरण केलं. याशिवाय कंपनीने अॅपल वॉच 2 ही लॉन्च केलं.
हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट आणि अधिक अॅडव्हान्स आयफोन असल्याचं टीम कूक यांनी सांगितलं.
32 GB, 64 GB आणि 256 GB मध्ये आयफोन 7 उपलब्ध असणार आहे. तर आयफोन 7 प्लस हा 32 GB, 128 GB आणि 256 GBमध्ये उपलब्ध असेल. आयफोन 7 मध्ये 2 GB रॅम तर आयफोन 7 प्लस आणि अॅपल वॉच 2मध्ये 4 GB रॅम देण्यात आला आहे.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये स्टेरिओ स्पीकर्स आहे. एक स्पीकर वर असून दुसरा फोनच्या खाली आहे. यामध्ये रेटिना HD डिसप्ले आहे, जो आधीच्या आयफोनच्या तुलनेत 25 टक्के ब्राईट आहे. विशेष म्हणजे हे आयफोन 3D टच असून वायरलेस पद्धतीने चार्ज करता येणार आहेत. आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसमध्ये 3.5mm ऑडिओ जॅक नाही. अॅपल इयर पॉड्स लायटनिंग कनेक्टरद्वारे वापरता येऊ शकतं.
फोनच्या डिझाईनमध्ये बदल करण्यात आला आहे. नव्या आयफोनची बॉडी ग्लास आणि मेटलपासून बनवली आहे. दोन्ही फोनमध्ये आणखी एक नवं फीचर अॅड केलं आहे, ते म्हणजे दोन्ही आयफोन वॉटर आणि डस्ट प्रूफ असतील.
आयफोन 7 मधील फिजिकल होम बटण काढून त्याजागी फोर्स सेन्सिटिव्ह बटण लावलं आहे,
आश्चर्यकारक बाब म्हणजे सुपर मारिओ हा प्रसिद्ध व्हिडीओ गेम वर्षअखेरीस आयफोनमध्ये उपलब्ध होणार आहे.
आयफोन 7 ची किंमत 649 डॉलर्स (सुमारे 43,100 रुपये) आहे. तर आयफोन 7 ची किंमत 749 डॉलर्स म्हणजेच सुमारे 49,700 रुपये आहे. 9 सप्टेंबरपासून दोन्ही आयफोनच्या प्री-ऑर्डरला सुरुवात होईल. यानंतर 16 सप्टेंबरपासून आयफोन ग्राहकांना उपलब्ध होईल.
परंतु भारतीयांना आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लससाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. भारतात 7 ऑक्टोबरला आयफोन 7 लॉन्च होणार असून त्यांची किंमत 60 हजारांपासून सुरु होईल.
आयफोन 7 आणि आयफोन 7 प्लसचे फीचर्स
ऑपरेटिंग सिस्टम : iOS 10
कॅमेरा : रिअर कॅमेरा 12 मेगापिक्सेल, फ्रण्ट कॅमेरा 7 मेगापिक्सेल, ड्यूएल कॅमेरा सेटअप (वाईड अँगल मॉड्यूल आणि टेलिफोटो)
रंग : ब्लॅक, जेट ब्लॅक, सिल्व्हर, गोल्ड, रोज गोल्ड
स्पीकर्स : स्टेरिओ स्पीकर्स
गेम : सुपर मारियो व्हिडीओ गेम
बटण : होम बटणऐवजी फोर्स सेन्सिटिव्ह
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
अहमदनगर
क्रीडा
क्रिकेट
Advertisement