एक्स्प्लोर
आयफोन 6 अवघ्या 9,990 रुपयात, फ्लिपकार्टवर खास एक्सचेंज ऑफर

मुंबई: ऑनलाईन शॉपिंग वेबसाइट फ्लिपकार्टनं आयफोन 6वर एक्सचेंज ऑफरमध्ये तब्बल 22,000 रु. ची सूट दिली आहे. त्यामुळे हा फोन अवघ्या 9,990 रुपयात तुम्ही खरेदी करु शकता.
आयफोन 6चा स्पेस ग्रे 16 जीबी मॉडेल आता तुम्ही 9,900 रुपयात खरेदी करु शकता. आजवरचं हे सर्वात मोठं डिस्काउंट असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच या स्मार्टफोनवर 5 हजार रुपयापर्यंत फ्लॅट डिस्काउंटही देण्यात आलं आहे.
जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर केला अॅक्सिस बँकेच्या साह्यानं तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटशिवाय 5 टक्के आणखी सूट मिळणार आहे.
जुना फोन बदलून तुम्ही सर्वाधिक 22,000 पर्यंत सूट मिळवू शकतात. पण फोनच्या मॉडेलवर याचं डिस्काउंट निश्चित केलं जाणार आहे. आयफोन 6 एस प्लस वर सर्वाधिक सूट आहे.
आयफोन 6 2015 साली लाँच करण्यात आला होता. त्यानंतर अॅपलनं गेल्याच वर्षीच आयफोन 7 आणि 7 प्लस हे दोन स्मार्टफोन लाँच केले होते.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बीड
क्रिकेट
व्यापार-उद्योग
मुंबई
Advertisement
Advertisement


















