(Source: ECI/ABP News/ABP Majha)
'या' दिवशी लॉन्च होणार मोस्ट अवेटेड Apple Iphone 14 आणि Watch Series 8, काउंटडाऊन सुरु
Iphone 14 Launch Date : अॅपल आयफोन 14 सीरिज अंतर्गत चार मॉडेल लॉन्च करु शकते. Apple Watch Series 8 ही होणार लॉन्च.
Iphone 14 Launch Date : अॅपल (Apple) युजर्सना आनंदाची बातमी. अॅपलनं त्यांच्या पुढील इव्हेंटच्या तारखा निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. अॅपल आयफोनमधील पुढची सीरिज आयफोन 14 लवकरच लॉन्च करु शकते, त्यासोबतच अॅपल आपली वॉच सीरिज 8 (Watch Series 8) ही या इव्हेंटमध्ये लॉन्च करणार असल्याची माहिती मिळत आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅपल 7 सप्टेंबर रोजी आयफोन 14 (Iphone 14 Launch Date) आणि वॉच सीरिज 8 लॉन्च करु शकतो, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, कंपनीकडून याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
आयफोन 14 होणार लॉन्च
अॅपल आयफोन 14 सीरिज अंतर्गत चार मॉडेल लॉन्च करु शकतं. ज्यामध्ये 6.1 इंचाचा आयफोन 14, 6.7 इंचाचा आयफोन 14 मॅक्स, 6.1 इंचचा आयफोन 14 प्रो आणि 6.7 इंचाचा आयफोन 14 प्रो मॅक्स या मॉडेल्सचा समावेश आहे. रिपोर्ट्सनुसार, अॅपलकडून स्टँडर्ड आयफोन 14 मॉडलमध्ये काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. परंतु, आयफोन 14 प्रो मॉडेलमध्ये अपडेटेड कॅमेरा दिला जाण्याची शक्यता आहे.
आयफोन 14 मध्ये युजर्सना फिचर्सची पर्वणी
ए16 बायोनिक चिप असणाऱ्या नव्या आयफोनमध्ये पिल-शेप्ड आणि होल-पंच कटआउट बाजूने नॉच काढून टाकू शकतात. विशेष म्हणजे, 5.4-इंचाचा iPhone Mini नसेल कारण लहान iPhone 12 आणि 13 Mini डिव्हाइसेसला युजर्सची फारशी पसंती न मिळाल्याचं कंपनीच्या निदर्शनास आलं आहे.
काय असेल किंमत?
सध्या सोशल माध्यमांवर आयफोन 14 बाबत लीक रिपोर्ट व्हायरल होत आहेत. त्यात, आयफोनच्या किंमतीचा देखील अंदाज लावला जाता आहे. iPhone 13 Pro आणि 13 Pro Max ची किंमत अनुक्रमे 1,000 डॉलर (77,640 रुपये) आणि 1,100 डॉलर (85,375 रुपये) इतकी आहे. ही किंमत गृहीत धरल्यास, आयफोन 14 सिरीजची किंमत देखील या किंमतीच्या आसपास असू शकते, असा अंदाज लीक रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे.
iPhone 14 Pro लूक
लीक रिपोर्टनुसार, आयफोन 14 प्रो जांभळ्या रंगात असेल. तसेच या आयफोनमध्ये गोल्ड आणि ग्रे रंगाचा पर्यात उपलब्ध असेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. नव्या आयफोन 14 प्रोमध्ये डिस्प्लेवर नॉनऐवजी पंच-होल आणि गोल कटआऊट डिझाइन असेल. शिवाय डिस्प्लेमध्ये अरुंद बेझल्स असतील, यामुळे या आयफोनला अधिक पॉलिश लूक मिळेल, असा अंदाज लीक रिपोर्ट्समध्ये वर्तवण्यात आला आहे.