Instagram Down: इंस्टाग्राम डाऊन, फॉलोअर्स कमी झाल्याच्या युजर्सच्या तक्रारी
Instagram Down: भारतासह इतर काही देशांमध्ये सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम डाऊन झालं आहे. यामुळे युजर्स मोठा प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करत आहेत.
Instagram Down: भारतासह इतर काही देशांमध्ये सोशल मीडिया साइट इंस्टाग्राम डाऊन झालं आहे. यामुळे युजर्स मोठा प्रमाणात आपली नाराजी व्यक्त करत आहेत. अनेक युजर्सनी दावा केला आहे की, यांचे अकाउंट अचानक सस्पेंड करण्यात आले आहेत. इंस्टाग्रामने अकाऊंट सस्पेंड करण्यामागचे कारणही दिले नसल्याचे युजर्सनी म्हटले आहे. ट्विटरवर अनेक लोकांनी सस्पेंड केलेल्या अकाऊंट चे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत. शेअर होत असलेल्या स्क्रीनशॉटमध्ये Instagram वरून एक नोटीस आल्याचं दिसत आहे, ज्यामध्ये असे लिहिले आहे की, तुमचे अकाऊंट 31 ऑक्टोबर 2022 रोजी सस्पेंड करण्यात आले आहे.
We're aware that some of you are having issues accessing your Instagram account. We're looking into it and apologize for the inconvenience. #instagramdown
— Instagram Comms (@InstagramComms) October 31, 2022
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जास्त लोकांवर याचा परिणाम झालेला नाही. अनेक लोकांशी याबाबत संवाद साधल्यानंतर असे समजले आहे की, अनेक युजर्सला इंस्टग्राम वापरताना कोणतीही अडचण आलेली नाही. दुसरीकडे काही लोकांनी असे म्हटले आहे की, अचानक त्यांचे इंस्टाग्राम फॉलोअर्स कमी झाले आहेत.
युजर्सला येणाऱ्या अडचणीबाबत इंस्टाग्रामनेही ट्वीट केले आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून इंस्टाग्रामने ट्वीट केले आहे की, आम्हाला माहिती आहे की, तुमच्यापैकी काहींना तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटमध्ये लॉगइन करण्यात अडचण येत आहेत. कंपनीने लवकरच इंस्टाग्राम सुरळीत होईल असं म्हटलं आहे. युजर्सला या अडचणीचा सामना करावा लागत आहे, यासाठी इंस्टाग्रामने दिलगिरीही व्यक्त केली आहे.
दरम्यान, अनेक इंस्टाग्राम युजर्सने आपले अकाउंट सस्पेंड झाल्याचं ट्वीट करत आहेत. यातच एका युजरने स्क्रीनशॉट शेअर केला आणि लिहिले आहेकी, "ट्विटरवर याची तक्रार करणाऱ्या इतर अनेकांसह माझे इंस्टाग्राम सस्पेंड करण्यात आले आहे. @instagram हॅक झाला आहे का? अशी तक्रार अनेक युजर्स करत आहेत.
My Instagram has just been suspended out of the blue along with lots of other people reporting the same on Twitter. Has @instagram been hacked??
— Jenny Garbis (@jennygarbis) October 31, 2022
Has this happened to anyone else?#instagramhacked pic.twitter.com/lzZWB1fP98