एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
रोबो वेटर असलेलं देशातील पहिलं हॉटेल चेन्नईमध्ये
या हॉटेलमधील रिसेप्शनिस्ट आणि वेटर हे रोबो आहेत. हॉटेलमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांची ऑर्डर घेणे आणि त्यांना जेवण वाढण्याचं काम हे रोबो करतात. त्यामुळे हे हॉटेल शहरात चर्चेचा विषय बनलं आहे.
चेन्नई : तंत्रज्ञानासाठी प्रसिद्ध असलेल्या चेन्नई शहरामध्ये देशातील पहिल्या रोबो हॉटेलचं उद्घाटन करण्यात आलं आहे. या हॉटेलमधील रिसेप्शनिस्ट आणि वेटर हे रोबो आहेत. हॉटेलमध्ये आलेल्या गिऱ्हाईकांची ऑर्डर घेणे आणि त्यांना जेवण वाढण्याचं काम हे रोबो करतात. त्यामुळे हे हॉटेल शहरात चर्चेचा विषय बनलं आहे.
या हॉटेल मालकाची ही दुसरी शाखा आहे. यापूर्वी कोयंबतूर येथे पहिल्या शाखेचं उद्घाटन करण्यात आलं होत. तर आता दुसरी शाखा ही मुगलीवक्कम परोरमध्ये सुरु करण्यात आली आहे. या हॉटेल्समधील रिसेप्शनिस्टसुद्धा रोबो इंग्रजी आणि तामीळ भाषेमध्ये संवाद साधतो.
मुगलीवक्कम पोररमधील हॉटेलमध्ये एकूण आठ रोबो आहेत. ज्यामध्ये 7 रोबो वेटर आणि एक रिसेप्शनिस्ट आहे. या रोबोंची नावं अजून ठेवण्यात आली नाहीत. मात्र गिऱ्हाईकांच्या सल्ल्याने या वेटर रोबोंची नावं ठेवण्यात येणार असल्याचं मालकानं सांगितलं.
हॉटेलच्या टेबलवर एक टॅब ठेवण्यात आला आहे. या टॅबद्वारे गिऱ्हाईक आपल्याला हवं त्या जेवणाचा मेनू सलेक्ट करतात. गिऱ्हाईकांनी सलेक्ट केलेलं ऑर्डर थेट किचनमध्ये जातो. किचनमधून ऑर्डर घेऊन रोबो त्या अचूक टेबलवर पोहोचवतो.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
करमणूक
Advertisement