WhatsApp Trick: तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा? तुम्हीच ठरवा... कसं?
तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा हे मॅनेज करु शकता. त्यामुळे फक्त तुमचे मित्र, कुटुंबिय इत्यादी लोक तुमचा प्रोफाईल फोटो पाहू शकतील.
![WhatsApp Trick: तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा? तुम्हीच ठरवा... कसं? how you can hide profile picture on whatsapp know Details WhatsApp Trick: तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा? तुम्हीच ठरवा... कसं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/08/26/407f2c6ad6e3ecf6c80e291704de07ec_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Tech News : मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप हे जगभरात सर्वाधिक लोकप्रिय अॅप आहे. हे अॅप लोकप्रिय आहे कारण ते यूजर्सच्या प्रत्येक सोयीची काळजी घेते. यूजर्सच्या गरजेनुसार व्हॉट्सअॅप नवनवीन फीचर अॅपमध्ये आणत असते. आता असंच एक फीचर आहे ज्याद्वारे तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा हे तुमच्या मर्जीवर अबलंबून राहणार आहे. त्यामुळे तुमच्या प्रोफाईल फोटोची प्रायव्हसी जपली जाणार आहे.
बऱ्याचदा लोक तुमच्या प्रोफाईल पिक्चरचा स्क्रीनशॉट घेऊ शकतात आणि तुम्हाला माहितीही नसते. प्रायव्हसीच्या दृष्टीने हे योग्य नाही. अशा परिस्थितीत तुमचा प्रोफाईल फोटो कुणी पाहावा हे मॅनेज करु शकता. त्यामुळे फक्त तुमचे मित्र, कुटुंबिय इत्यादी लोक तुमचा प्रोफाईल फोटो पाहू शकतील. आता हे कसं करायचं याची माहिती जाणून घेऊयात.
व्हॉट्सअॅपवर प्रोफाईल फोटो कसा हाईड करणार?
- प्रोफाईल फोटो हाईड आधी व्हॉट्सअॅप ओपन करा.
- त्यानंतर व्हॉट्सअॅपच्या Settings मध्ये जा.
- आता Account मध्ये जा आणि Privecy टॅप करा.
- त्यानंतर, प्रोफाइल पिचरवर टॅप करा.
- व्हॉट्सअॅपवरील डिफॉल्ट सेटिंगमध्ये, तुमचा प्रोफाइल फोटो म्हणजे प्रत्येकाला ते पाहण्याची परवानगी आहे.
- जर तुम्हाला तुमचा प्रोफाईल पिक्चर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असलेल्या लोकांनाच दाखवायचा असेल तर सेटिंग्जमध्ये जा आणि Everyone ऐवजी My Contact वर क्लिक करा.
- जर तुम्हाला तुमचा प्रोफाईल फोटो कुणीच पाहू नये असं वाटत असेल, तर तुम्हाला त्यात No One चा पर्याय निवडावा लागेल. असं केल्याने कुणीही तुमचा प्रोफाईल फोटो पाहू शकणार नाही.
इतर महत्त्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)