डिलीट केलेलं WhatsApp chat परत कसं मिळवलं जाऊ शकतं?
आपण बऱ्याचवेळा व्हॉट्सएप चॅट डिलीट करतो. मात्र, ते परत मिळवता येतं का? आणि येत असेल तर ते कसं यावर सायबर एक्सपर्ट राजस पाठक यांनी माहिती दिली आहे.
व्हॉट्सएपचं एन्ड टू एन्ड इनस्क्रिप्शन हे फिचर आहे. यामध्ये एक मेसेज हा एका युजरपासून दुसऱ्या युजरला जेव्हा सेंड होतो तेव्हा तो सेंड होताना सिक्यूअर आहे. म्हणजे हा मेसेज दुसरं कुणी वाचू शकण्याचे चान्सेस तसे कमी आहेत. पण हे चॅट व्हॉट्सएपच्या मधून जरी तुम्हा डिलीट केले तरीही ते फोनच्या मेमरीमधून किंवा व्हॉट्सएपच्या डेटाबेस फाईलमधून रिट्रीव्ह नक्की करता येतात. हे करण्यासाठी बरीच सॉफ्टवेअर उपलब्ध आहेत. याला डिजीटल सॉफ्टवेअर किंवा डेटा रिट्रिव्ह करण्याचं सॉफ्टवेअर म्हणतात. एंड्राइड, आयओएस, विंडोज, लिनक्स अशा विविध ओपरेटींग सिस्टिमसाठी हे सोफ्टवेअर मिळतात. यामधून चॅट्स रिट्र्व्ह करता येतात. सायबर एक्सपर्ट राजस पाठक यांनी ही माहिती दिली आहे.
चॅट्स कशासाठी रिट्रिव्ह करायचे आहेत, तो उद्देश महत्त्वाचा ठरतो. कायदेशीर प्रक्रियेसाठी जर हे चॅट्स हवे असतील तर ते मिळवणं शक्य आहे. त्याला कोर्टाची परवानगी घेऊन हे करता येऊ शकतं. ज्याचे चॅट्स आहेत त्याच्या परवानगी शिवाय किंवा कोर्टाच्या आदेशाशिवाय असं करणं बेकायदेशीर ठरू शकतं.
आपण जो फोन किंवा कॉम्प्यूटर वापरतो त्यामध्ये दोन प्रकारचे यूजर राईट्स असतात. पहिला एडमिनिस्ट्रेटर आणि दुसरा युजर राईट असतो. एडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा रुट राईट्स जर मिळाले तर डिलीट केलेले चॅट्स परत मिळवणं खूप सोपं आहे.
WhatsApp web वरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य; जाणून घ्या प्रोसेस
व्हॉट्सएप चॅट जरी फोन मधून डिलीट झाले पण त्यांचा जर गुगल ड्राईव्हवर बॅकअप घेतला असेल तर ड्राईव्हवरुन ते परत मिळवणं तेवढंच सोपं आहे. तपासयंत्रणा असतात त्या एकतर फोनला फिजीकली एक्सेस करुन हे चॅट्स मिळवतात किंवा त्या यूजरशी जे कॉन्फिगर केलेलं जे अकाऊंट आहे त्यातून ते हे चॅट्स परत मिळवू शकतात.
एखाद्या व्यक्तीसोबतचं चॅट हे त्या आपल्या फोनवरुन त्या चॅट विन्डोमधून डिलीट होतं. पण ते चॅट व्हॉट्सएपच्या डेटाबेसमधून डिलीट व्हायला वेळ लागतो. काल एखादा चॅट डिलीट केला असेल तर तो परवाच्या डेटाबेसमध्ये सापडतो. व्हॉट्सअपचं एक डेटाबेस फाईल तयार करतं. ती फाईल सेव्ह करतं. एखादा चतुर युजर ही डेटाबेस फाईल तयार होण्याआधीच ते चॅट डीलीट करतो.
सरकारी यंत्रणांनी सोशल मीडियाला सांगून ठेवलेलं असतं की, आम्हाला तपासासाठी जर काही डिलीट केलेल्या गोष्टी लागल्या तर तुमच्याकडे अशी सिस्टिम पाहिजे की ज्यातून आम्ही त्या परत मिळवू शकलो पाहिजे.
Drugs Case | ड्रग्जबाबतच्या व्हॉट्सअॅप चॅटसंदर्भात रकुलची कबुली, ड्रग्ज न घेतल्याचा दावा- सूत्र