WhatsApp web वरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य; जाणून घ्या प्रोसेस
व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगचं फिचर अत्यंत खास आहे. WhatsApp मोबाइल व्यतिरिक्त कम्प्युटरवरही वापरण्यात येतं. परंतु. फार कमी लोकांना माहिती आहे की, व्हॉट्सअॅप वेबवरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य आहे.
मुंबई : WhatsApp आपल्या आयुष्याचा एक महत्त्वाचा घटक बनलं आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. व्हॉट्सअॅप फक्त मेसेज करण्यासाठीच नाहीतर व्हॉइस कॉलिंग आणि व्हिडीओ कॉलिंगसाठीही उपयोगी ठरतं. व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलिंगचं फिचर अत्यंत खास आहे. कारण यासाठी वेगळे पैसे मोजावे लागत नाहीत. त्यासाठी फक्त फोनमध्ये इंटरनेट असणं गरजेचं आहे.
WhatsApp मोबाइल व्यतिरिक्त कम्प्युटरवरही वापरण्यात येतं. परंतु. फार कमी लोकांना माहिती आहे की, व्हॉट्सअॅप वेबवरूनही व्हिडीओ कॉल करणं शक्य आहे. आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत की, व्हॉट्सॅप वेबवरून व्हिडीओ कॉलिंग करण्याची पद्धत...
कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर सर्वात आधी व्हॉट्सअॅप वेब ओपन करा. त्यानंतर तुम्हाला तीन वर्टिकल डॉट्स दिसून येतील. त्यावर क्लिक करून तुम्हाला एक रूम क्रिएट करावी लागेल. त्यानंतर तुम्हाला एक पॉपअप दिसून येईल. त्यावर क्लिककरून तुम्ही मेसेंजरवर जाऊ शकता. त्यासाठी तुम्हाला फेसबुक अकाउंटची गरज नाही.
मेसेंजरवर गेल्यानंतर तिथे रूम क्रिएट करा आणि त्यानंतर तुम्ही व्हिडीओ कॉल करू शकणार आहात. काही लोकांसोबत रूम क्रिएट करण्यासाठी तुम्हाला चॅट विंडोवर जाऊन अटॅचमेंट वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर पुन्हा रूमवर क्लिक करावं लागेल.
मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करण्यासाठी ऑप्शन
मोबाईलवरून व्हिडीओ कॉल करण्यासाठी तुमच्या फोनमधील व्हॉट्सअॅप ओपन करा. त्यानंतर ज्या व्यक्तीला व्हिडीओ कॉल करायचा आहे. त्याचं चॅट ओपन करा आणि तिथे असलेल्या व्हिडीओ कॅमेऱ्याच्या आयकॉनवर क्लिक करा.
WhatsApp वर एकाच वेळी 50 लोकांना व्हिडीओ कॉल शक्य
50 लोकांसोबत असा करा व्हिडीओ कॉल :1. सर्वात आधी WhatsApp ओपन करून कॉल करण्याचा ऑप्शन सिलेक्ट करा
2. त्यानंतर Create a room ऑप्शनवर क्लिक करा. 3. आता तुम्ही जसं Continue in Messenger ऑप्शन वर क्लिक कराल तेव्हा तुमच्यासमोर मेसेंजर अॅपची ओपन होईल. 4. आता Try it, when prompted वर क्लिक करा. 5. यानंतर Create Room वर क्लिक करा आणि रुमला एक नाव द्या. 6. आता Send Link on WhatsApp वर क्लिक करा. यामुळे व्हॉट्सअॅप पुन्हा ओपन होईल. 7. आता या रूमची लिंक कॉन्टॅक्ट किंवा ग्रुप्समध्ये शेअर करा.WhatsApp वर Rooms जॉईन करण्याची पद्धत :
- WhatsApp वर पाठवलेल्या रूम लिंकवर क्लिक करा.
- ही लिंक मेसेंजर अॅप किंवा वेबसाइटवर ओपन होईल.
- आता रूम जॉईन करण्यासोबतच 50 लोक व्हिडीओ किंवा ऑडियो कॉल करू शकतात.