How to Delete Your Instagram Account: इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करायचंय? पहा ही डेटा डाउनलोड करण्याची सोपी पद्धत
इन्स्टाग्राम हे अनेकांचे आवडतं अॅप आहे.
सोशल मीडियावरील इन्स्टाग्राम हे अनेकांचे आवडतं अॅप आहे. या अॅपमध्ये लोक रिल्स या फिचरचा वापर करत आसतात. वेगवेगळे कलाकार त्यांच्या गाण्यावरील रिल्स व्हिडीओ तयार करून इन्स्टाग्रामवर अपलोड करतात. अनेक वेळा एकाच व्यक्तिचे अनेक इन्स्टाग्राम अकाउंट असतात. अनेक लोक नवनविन इन्स्टाग्राम अकाउंट तयार करतात आणि त्यावरून पोस्ट शेअर करतात. काहींनी आता सोशल मीडियापासून दूर राहण्यासाठी त्यांच्या मोबईलमधील सर्व सोशल मीडिया अॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहेत. अनेकांनी फेसबुक बरोबरच आता इन्स्टाग्रामवर वापरणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोशल मीडियापासून दूर राहणे वाटते तितके सोपे नाही. अकाउंट डिलीट केले तर तुमचा इन्स्टाग्रामवरील सर्व डेटा डिलीट होतो. त्यामुळे तुमचे इन्टाग्रामवरील मित्र मैत्रिणींसोबतचे किंवा कुटुंबासोबतचे फोटो आणि व्हिडीओ डिलीट होऊ शकतात. त्यामुळे इन्स्टाग्राम अकाउंट डिलीट करण्याआधी तुम्हाला तुमचा सर्व डेटा मिळावायचा असेल तर ही सोपी ट्रिक ट्राय करा.
अकाउंट डिलीट करण्याआधी असा मिळवा इन्स्टाग्रामवरील डेटा
सर्वप्रथम इन्स्टाग्राम अकाउंट मोबाईल किंवा डेस्कटॉपमध्ये लॉग-इन करा. त्यानंतर ओपन झालेल्या तुमच्या अकाउंटमधील डेटा डाऊनलोड करा. डेटा डाऊनलॉड करण्यासाठी इन्स्टाग्रामवरील तुमच्या प्रोफाइल वरील सेटिंग या ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर प्रायव्हसी अॅंड सिक्युरिटी हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर रिक्वेस्ट डाऊनलोड हे बटण क्लिक करा. त्यानंतर तुमचा ई-मेल आयडी तिथे टाईप करा. त्यानंतर 48 तासांनंतर इन्स्टाग्रामकडून तुमचा सर्व डेटा मेलद्वारे पाठवला जातो. डेटा मिळाल्यानंतर अकाऊंट डिलीट करा.
अकाऊंट डिलीट करण्याची पद्धत
इन्स्टाग्राम अकाऊंटवर पुन्हा लॉग इन करा. त्यानंतर अकाऊंट डिलीट ऑप्शन सिलेक्ट करा. हा ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इन्स्टाग्राम पासवर्ड पुन्हा टाईप करावा लागेल. त्यानंतर 'permanently delete my account' या ऑप्शनवर क्लिक करा. अकाउंट डिलीट केल्यानंतर तुम्ही पुन्हा या डिलीट केलेल्या अकाउंटवरूवन पुन्हा लॉग-इन करू शकणार नाही. त्यामुळे तुम्हाला नवे अकाउंट तयार करण्यासाठी पुन्हा नवा आयडी पासवर्ड तयार करावा लागेल.