आता whatsapp वरूनही बुक करता येणार Uber कॅब, कसे बुक कराल? ते जाणून घ्या
Book Uber On WhatsApp: उबर राइड्स आता व्हॉट्सअॅपवर बुक करता येणार आहेत. कॅब कंपनी उबर लवकरच व्हॉट्सअॅपसाठी हा नवीन पर्याय आणणार आहे.
Book Uber On WhatsApp: आता तुम्हाला इन्स्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपवर (Whatsapp) कॅब बुक करण्याची सुविधाही दिली जात आहे. उबर राइड्स (Uber Rides) आता व्हॉट्सअॅपवर बुक करता येणार आहेत. कॅब कंपनी उबर लवकरच व्हॉट्सअॅपसाठी हा नवीन पर्याय आणणार आहे. उबर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून दिल्ली-एनसीआरसाठी ही नवीन कॅब बुकिंग सेवा सुरू करण्याची तयारी करत आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये लखनौ शहरात या फीचरची पहिल्यांदा चाचणी घेण्यात आली होती. जर हा प्रयोग यशस्वी झाला, तर यानंतर तुम्हाला Uber अॅप स्वतंत्रपणे डाउनलोड करण्याची गरज नाही.
ड्रायव्हरला युजरचा व्हॉट्सअॅप नंबर पाहता येणार नाही
उबेरच्या माहितीनिसार, जे युझर्स व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक करतात त्यांना थेट उबेर अॅपवर राइड्स बुक करताना सुरक्षा प्रदान केली जाईल. व्हॉट्सअॅपद्वारे कॅब बुक केल्यानंतरही, राईडरचे किंवा चालकाचे नाव, लायसन्स प्लेट अशी माहिती युजर्सना पाठवली जाईल. तसेच पिकअप पॉइंटची माहिती ठिकाणाच्या आधारे चालकाला पाठवली जाईल. त्याचबरोबर चालकाशी बोलताना युजरची ओळख गोपनीय ठेवली जाईल. याचा अर्थ ड्रायव्हरला युजरचा व्हॉट्सअॅप नंबर पाहता येणार नाहीत.
व्हॉट्सअॅपने कॅब बुक कशी कराल?
तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअॅपवर +91 7292000002 या नंबरवर 'हाय' लिहून मेसेज करावा लागेल.
मेसेज केल्यानंतर, तुम्हाला चॅटबॉटमध्ये पिकअप आणि ड्रॉप लोकेशन विचारले जाईल.
स्थान माहिती दिल्यानंतर, तुम्हाला राइडची माहिती दिली जाईल, भाडे आणि ड्रायव्हरची अपेक्षित आगमन वेळ दर्शवेल.
एकदा तुम्ही ओके केल्यानंतर, तुम्हाला ड्रायव्हरची माहिती आणि OTP पाठवला जाईल.
यानंतर तुम्ही OTP टाकून राइड सुरू करू शकाल.
महत्वाच्या बातम्या :
- Robot Birds : रोबोट बर्ड घेतोय पंख पसरवून हवेत भरारी, वजन गोल्फ बॉलपेक्षाही हलके
- IQOO 9T 5G फोन सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि उत्कृष्ट बॅटरीसह झाला लॉन्च, जाणून घ्या फिचर्स, किंमत
- युजर्सना क्रेझी करण्यासाठी येतोय Vivo चा धमाकेदार रंग बदलणारा 5G Smartphone; काय असेल किंमत?