एक्स्प्लोर

विराटचा फॅन, दीपिका फेव्हरेट, सुंदर पिचाईंनी उलगडल्या आठवणी

खरगपूर : गुगलचे सीईओ असलेल्या सुंदर पिचाई यांना जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी गुगल करण्याची गरज भासली नाही. आयआयटी खरगपूर या आपल्या विद्यानगरीत तब्बल 23 वर्षांनी पाऊल ठेवताच पिचाईंना कॉलेजचे दिवस आठवत गेले आणि सध्याच्या विद्यार्थ्यांसमोर त्यांनी आपला प्रवास उलगडला. 'दीपिका पदुकोण माझी आवडती अभिनेत्री आहे. विराट कोहलीचा मी चाहता आहे' असं सुंदर पिचाईंनी गप्पा मारताना सांगितलं. चेन्नईत लहानाचे मोठे झालेले पिचाई आयआयटी खरगपूरमध्ये दाखल झाले. 'त्यावेळी कोणीही अबे साले अशी हाक मारायचं. मला हिंदी फारसं यायचं नाही आणि ही एकमेकांना हाक मारण्याची पद्धत आहे, असा माझा समज झाला. एकदा मेसमध्ये मी मोठ्याने 'अबे साले' असं ओरडलो. सगळीकडे शांतता पसरली. नंतर माझ्या लक्षात आलं की ही भाषा योग्य नाही' अशा किश्श्यांनी सुंदर पिचाईंच्या गप्पांना सुरुवात झाली. आयआयटी खरगपूरमध्ये गेल्यावर पहिल्यांदा कॉम्प्युटर पाहिल्याचंही सुंदर यांनी सांगितलं. 'आयआयटीत प्रवेश मिळवणं कठीण होतं. मी क्लासेस बंकही करायचो. तो प्रत्येक विद्यार्थ्याचा अधिकार आहे', असं सुंदर यांनी डोळा मारत सांगितलं. 'मी रात्री उशिरापर्यंत जागायचो, आणि सकाळी लेक्चर चुकवायचो' अशी आठवण पिचाईंनी सांगितली. अभ्यासक्रमातील शिक्षण तितकंसं महत्त्वाचं नसल्याचंही पिचाई म्हणाले. सुंदर आणि त्यांची पत्नी अंजली यांची भेटही खरगपूरच्या कॅम्पसमध्येच झाली. 'अंजलीला भेटणं तितकंसं सोपं नव्हतं, मुलींच्या हॉस्टेलमध्ये जाणं कठीण होतं. कोणीतरी बाहेरुन ओरडायचं, 'अंजली, सुंदर तुला भेटायला आलाय...' त्यामुळे प्रायव्हसीचा प्रश्नच येत नाही' ही आठवण सुंदर यांनी आवर्जून सांगितली. गुगलचे सीईओ म्हणजे अभ्यासू कीडा असा एखाद्याचा समज असू शकेल, मात्र आपण कॉफी विथ करण आवडीने पाहतो, असं पिचाईंनी सांगितलं. 'दीपिका पदुकोण माझी आवडती अभिनेत्री आहे. विराट कोहलीचा मी चाहता आहे' असंही सुंदर म्हणाले. कोण आहेत सुंदर पिचाई? 2015 मध्ये ऑगस्ट महिन्यात सुंदर पिचाई यांची गुगलच्या सीईओपदी वर्णी लागली. पिचाई हे टेक वर्ल्डमधील मोठं नावं आहे. सुंदर पिचाई मागील बारा-तेरा वर्षांपासून गूगलमध्ये काम करत आहे. पिचाई हे गूगलच्या अँड्रॉईड, क्रोम आणि अप्स डिव्हिजनचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट होते. अँड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टम डेव्हलपमेंटमध्ये सुंदर पिचाई यांची महत्त्वाची भूमिका होती. पिचाई यांचे वडील इलेक्ट्रिकल इंजिनीअर होते, तर सुंदर पिचाई यांना लहानपणापासूनच गॅझेट्सची आवड होती. इतकंच नाही तर सुंदर पिचाई हे त्यांच्या शाळेच्या क्रिकेट संघाचे कर्णधारही होते. जन्म – – सुंदर पिचाई यांचं जन्म चेन्नईमध्ये 1972 मध्ये झाला होता आणि आता ते 45 वर्षांचे आहेत. –  त्यांचं खरं नाव पिचाई सुंदराजन आहे. पण त्यांना सुंदर पिचाई नावानेच ओळखलं जातं – सुंदर पिचाई 2004 मध्ये गूगल जॉईन केलं होतं. त्यावेळी ते प्रोडक्ट आणि इनोव्हेशन ऑफिसर होते. शिक्षण- – पिचाई यांना पेन्सिलव्हानिया यूनिव्हर्सिटीमध्ये सायबेल स्कॉलर नावाने ओळखलं जात होतं. – पिचाई यांनी त्यांची इंजिनीअरिंगची पदवी आयआयटी, खडगपूरमधून घेतली आहे. ते बॅचमधील सिल्वर मेडलिस्ट होते. – अमेरिकेतील स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये सुंदर यांनी एमएसचं शिक्षण पूर्ण केलं तर वॉर्टन यूनिव्हर्सिटीमधून एमबीए केलं.

संबंधित बातम्या :

नरेंद्र मोदींची लवकरच भेट व्हावी: सुंदर पिचाई

दोन खोल्या, टीव्ही नसलेलं घर ते गुगलचा सम्राट

मोठी पदं सांभाळून जगात दबदबा निर्माण करणारे भारतीय

भारतात जन्मलेले सुंदर पिचाई गूगलचे नवे सीईओ

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget