(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google Doodle Artwork Competition : Google कडून विद्यार्थ्यांसाठी Doodle Artwork Competition; 30 सप्टेंबर पर्यंत करू शकता अर्ज
Google Doodle Artwork Competition : Google Doodle स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना 30 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज करता येतील.
Google Doodle Artwork Competition : जगातील सर्वात मोठ्या सर्च इंजिन गुगलने विद्यार्थ्यांच्या बुद्धीमत्तेला चालना देण्यासाठी एक नवीन उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाअंतर्गत Google ने भारतीय विद्यार्थ्यांसाठी Google Doodle Artwork Competition चे आयोजन केले आहे. या डूडल (Doodle) कलाकृती स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांकडून 'पुढील 25 वर्षांत भारत' या विषयावर आपली कलाकृती सादर करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी विद्यार्थी 30 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेर्यंत अर्ज करू शकतात.
काय आहे स्पर्धा?
गुगलने आयोजित केलेली गुगल डूडल ही स्पर्धा येत्या 25 वर्षांत भारताला काय अपेक्षित आहे या संकल्पनेवर आधारित आहे. विद्यार्थ्यांच्या दृष्टीकोनातून, कल्पना विश्वातून आगामी भारताचे नवे स्वरूप कसे असावे? अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव तर मिळेलच पण त्याचबरोबर त्यांचे व्हिजन देखील दिसून येईल. या स्पर्धेसाठी विद्यार्थी 30 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार कोणत्याही सामग्रीसह त्यांची कला सादर करू शकतात. मात्र, यासाठी विद्यार्थ्यांनी प्रवेश फॉर्म वापरून सर्व डूडल प्रविष्ट करणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभाग घेतलेल्या विद्यार्थ्यांची कलात्मकता, कौशल्ये, सर्जनशीलता आणि त्यांच्या लिखाणातील वाक्य (Quots) या आधारावर निकाल जाहीर केला जाईल.
गुगल डूडल स्पर्धा 2022 स्पर्धेत अर्ज कसा करावा?
या स्पर्धेत सहभागी होण्यास इच्छुक असलेले विद्यार्थी https://doodles.google.co.in/d4g/enter/ या वेबसाईटला भेट देऊन स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. त्यांना अर्जामध्ये सर्व आवश्यक तपशील भरायचे आहेत. तसेच, तयार केलेले डूडल अपलोड करून अर्ज सबमिट करायचा आहे.
गुगल डूडल स्पर्धा 2022 राष्ट्रीय विजेता निवड
विद्यार्थ्यांनी तयार केलेले डूडल पाच श्रेणींमध्ये विभागले जाणार आहे. यानंतर गेस्ट जज आणि गुगल डूडलर नंतर राष्ट्रीय अंतिम स्पर्धक. प्रत्येक ग्रेड गटातून चार स्पर्धक निवडण्यात येतील. डूडल 4 Google वेबसाइटवर एकूण 20 अंतिम स्पर्धक ऑनलाईन गॅलरीमध्ये दिसतील. 31 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत, भारतीय नागरिकांनी या 20 राष्ट्रीय अंतिम स्पर्धकांपैकी त्यांच्या आवडत्या डूडलला मतदान करतील. मतांच्या आधारे गटातील विजेत्यांची नावे निश्चित केली जातील.
शेवटी, मिळालेल्या स्कोअरच्या आधारे सार्वजनिक मतदान, न्यायाधीशांचे स्कोअर आणि Google अधिकार्यांच्या पॅनेलचा समावेश असलेला स्कोअर मोजला जाईल. या सर्व गुणांच्या आधारे 14 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय विजेत्याची घोषणा केली जाईल.
Google Doodle Contest 2022: हे करू नका
जे विद्यार्थी डूडल शेअर करतील सर्वात आधी ते त्यांची स्वत:ची कलाकृती असावी. यामध्ये कोणताही लोगो किंवा कॉपीराईट केलेला फोटो नसावा. तसेच, विद्यार्थ्यानी पहिल्या पाठविलेल्या डूडलचाच प्राधान्य दिले जाईल. असे या स्पर्धेचे नियम आहेत.
महत्वाच्या बातम्या :