एक्स्प्लोर
Advertisement
CNG वर चालणाऱ्या स्कूटीचं मुंबईत अनावरण
मुंबई : मुंबईत सीएनजीवर चालणाऱ्या स्कूटीचं अनावरण करण्यात आलं. 1.2 किलो सीएनजी सिलेंडरची क्षमता असलेली ही दुचाकी 90 ते 110 किमीपर्यंत धावू शकते.
केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या दुचाकीचं अनावरण करण्यात आलं. स्वस्त आणि पर्यावरणपूरक असं या दुचाकीचं वैशिष्टय आहे.
दरम्यान प्रस्तावित मुंबई-नागपूर या समृद्धी महामार्गावर गॅस पाईपलाईन टाकण्यात येणार असल्याचंही धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलंय. तर जे विद्यार्थी ग्रीन एनर्जीचा वापर करतील, अशा विद्यार्थ्यांसाठी विशेष गुणांचा विचार केला जाईल, असं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय.
राज्यातील प्रमुख शहरातील विद्यार्थ्यांनी सीएनजी बाईकचा वापर केल्यास अतिरिक्त गुण दिले जातील, ज्यामुळे पर्यावरणाचाही फायदा होईल, असं विनोद तावडे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
महाराष्ट्र
भविष्य
Advertisement