एक्स्प्लोर

भारतातील निवडणुकांत फेसबुकचा हस्तक्षेप नसेल: झुकरबर्ग

फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अमेरिकन संसद अर्थात अमेरिकन काँग्रेससमोर हजेरी लावली.

न्यूयॉर्क: केंब्रिज अॅनालिटिका डेटा लीकप्रकरणी फेसबुकचा संस्थापक मार्क झुकरबर्गने अमेरिकन संसद अर्थात अमेरिकन काँग्रेससमोर हजेरी लावली. यावेळी 44 सिनेटर्सनी (खासदार) झुकरबर्गला वैयक्तिकपणे प्रश्नांचा भडीमार केला. प्रत्येक सिनेटर्सला 5-5 मिनिटांचा अवधी देण्यात आला होता. यावेळी 44 सिनेटर्सनी आपआपला वेळ घेत, झुकरबर्गवर प्रश्नांचा भडीमार केला. यावेळी झुकरबर्ग चांगलाच घाबरलेला दिसला. भारतातील निवडणुकांवर प्रभाव नाही भारतात होणाऱ्या आगामी निवडणुकांमध्ये फेसबुककडून कोणताही हस्तक्षेप केला जाणार नाही, अशी ग्वाही झुकरबर्गने दिली. "भारतातील निवडणुकांमध्ये फेसबुकचा प्रभाव नसेल, त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत", असं झुकरबर्ग म्हणाला. सिनेटर्सच्या प्रश्नावर उत्तर देताना झुकरबर्ग म्हणाला,

“2018 हे वर्ष निवडणुकांसाठी महत्त्वाचं आहे.

यावर्षी अमेरिकेत मध्यावधी निवडणुका होणार आहेत.

तर भारत, पाकिस्तान, ब्राझील यासारख्या देशांमध्येही निवडणुका आहेत.

मात्र या निवडणुकांमध्ये फेसबुकचा हस्तक्षेप होणार नाही,यासाठी आम्ही प्रयत्न करु”

झुकरबर्गचा माफीनामा दरम्यान, झुकरबर्गने डेटा लीकप्रकरणी सिनेटर्ससमोर जाहीर माफी मागितली. केंब्रिज अॅनालिटिकाने अमेरिकेतील निवडणुकीसाठी 8.7 कोटी फेसबुक युजर्सची खासगी माहिती मिळवली. मात्र हे रोकण्यात आम्ही कमी पडलो, असं झुकरबर्ग म्हणाला. आणखी वाचा : व्हायरल सत्य : BFF हिरव्या रंगात पोस्ट झालं तरच अकाऊंट सुरक्षित? झुकरबर्गने यापूर्वीही माफी मागितली होती. करियरमध्ये अशी घटना पहिल्यांदाच घडल्याचं तो म्हणाला. आम्ही आमच्या जबाबदाऱ्या नीट पार पाडू शकलो नाही, ती आमची मोठी चूक होती, असं झुकरबर्ग म्हणाला.

"मी फेसबुक सुरु केलं, मी ते चालवलं.

त्यामुळे त्यासाठी सर्वस्वी मीच जबाबदार आहे",

असं त्याने नमूद केलं.

वादामागे कोण? फेसबुक डेटा स्कँडलमध्ये इंग्लंडमधील राजकीय संशोधन संस्था केम्ब्रिज अॅनालिटिका असल्याचा आरोप आहे. या संस्थेने फेसबुकवरील जवळपास 9 कोटी युजर्सचा डेटा चोरुन, तो अमेरिकेत 2016 मध्ये झालेल्या निवडणुकीत वापरल्याचा आरोप आहे. भारतासह आशियाई देशातही डेटाचोरी? केम्ब्रिज अॅनालिटिकाने केवळ अमेरिकेतीलच युझर्सची डेटाचोरी केली नाही तर त्यांनी आपले पाय आशियातही पसरवले आहेत. भारत, इंडोनेशिया, फिलीपाईन्ससह ऑस्ट्रेलियातही डेटाचोरी करण्यात आली आहे. फेसबुकविरोधात ऑस्ट्रेलियाची पावलं डेटा स्कँडलमुळे ऑस्ट्रेलियाने फेसबुकविरोधात चौकशी सुरु केली आहे. फेसबुकची औपचारिक चौकशी सुरु असल्याची माहिती, ऑस्ट्रेलियाचे प्रायव्हसी कमीशनने दिली.  ऑस्ट्रेलियातील 3 लाख फेसबुक युजर्सचा डेटाचोरी झाल्याचा आरोप आहे. काय आहे फेसबुक डेटा लीक प्रकरण? 2016 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 9 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे. ब्रिटनस्थित केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले. एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत. संबंधित बातम्या

8 कोटी 70 लाख फेसबुक युझर्सच्या डेटाचा गैरवापर!

व्हायरल सत्य : BFF हिरव्या रंगात पोस्ट झालं तरच अकाऊंट सुरक्षित?
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Nashik Crime News : नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
Bihar Election Dates : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? 'या' मार्गाचा वापर करा अन् पैसे परत मिळवा
पैसे पाठवताना चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? टेन्शन घेऊ नका या मार्गांचा वापर करा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

RSS 100 years: Documentary on Rashtriya Swayamsevak Sangh: शतसाधना :संघ एक, अध्याय अनेक Shatsadhana
Manoj Jarange Dasara Melava : राज्यभरातून शेतकरी बैठकीला बोलावू, आंदोलन सुरु करु; जरांगेंचा इशारा
Manoj Jarange Dasara Melava : त्या राज ठाकरेकडे कमी आहे का? त्याची प्रॉपर्टी कापाना...जरांगे कडाडले
Manoj Jarange Dasara Melava : हेक्टरी 70 हजार ते 100 टक्के भरपाई...मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
Manoj Jarange Dasara Melava : दिवाळीआधी ओला दुष्काळ जाहीर करा, मनोज जरांगेंचा सरकारला अल्टिमेटम

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gopichand Padalkar : बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
बीडच्या जेलमध्ये बायबलचे श्लोक, धर्मांतरणासाठी लाखो रुपयांची ऑफर; गोपीचंद पडळकरांचा जेलरवर आरोप
Nashik Crime News : नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
नाशिकमध्ये बॅनरबाजी करत इन्स्टावर 'दबंगगिरी' करणाऱ्या सराईतांना पोलिसांचा दणका; गुंडांच्या सोशल मिडीयावरही 'स्ट्राईक'
Bihar Election Dates : बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
बिहारच्या निवडणुका दोन टप्प्यात, 6 आणि 11 नोव्हेंबर रोजी मतदान, तर 14 नोव्हेंबर रोजी निकाल, किती कोटी मतदार मतदान करणार?
Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? 'या' मार्गाचा वापर करा अन् पैसे परत मिळवा
पैसे पाठवताना चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? टेन्शन घेऊ नका या मार्गांचा वापर करा
Bihar Election 2025: मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
मतदारयादीचं शुद्धीकरण केलं, बिहार निवडणूक पारदर्शक होणार, निवडणुकीच्या 10 दिवस आधीपर्यंत नावे जोडता येतील, ओळखपत्रही मिळेल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार
थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना हल्ल्याचा प्रयत्न; सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
थेट सर्वोच्च न्यायालयात सुनावणी करताना हल्ल्याचा प्रयत्न; सरन्यायाधीश भूषण गवई यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
Nagarpanchayat Election Reservation: लागा तयारीला! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, नागपूरच्या उमरेड अन् काटोल महिला OBC प्रवर्गासाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी!
लागा तयारीला! नगरपरिषद अन् नगरपंचायतीचं आरक्षण जाहीर, नागपूरच्या उमरेड अन् काटोल महिला OBC प्रवर्गासाठी राखीव; पाहा संपूर्ण यादी!
Bihar Election : बिहार निवडणुकीत आप सर्व  जागा लढणार, पहिली उमेदवार यादी जाहीर, आयोगाच्या पत्रकार परिषदेपूर्वीच घोषणा 
केजरीवालांचा पक्ष बिहारमध्ये सर्व जागा स्वतंत्र लढणार, आम आदमी पार्टीची पहिली यादी जाहीर
Embed widget