एक्स्प्लोर

Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय अन् बँक खात्यात गेल्यास परत कसे मिळवायचे? 'या' मार्गाचा वापर करा अन् पैसे परत मिळवा

Wrong UPI Transfer Refund : पैसे चुकीच्या यूपीआय आणि बँक खात्यात गेले असतील तर परत कसे मिळवायचे यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेणार आहोत.

नवी दिल्ली : पैशांचा व्यवहार करताना अनेकदा रोख रकमेचा वापर केला जायचा. मात्र, सध्याच्या काळात प्रत्येक काम ऑनलाईन होत आहे. लोक मोबाईलवरुन शॉपिंग, बँकिंग आणि पेमेंट करतात. नेट बँकिंग आमि यूपीआय द्वारे सर्वाधिक व्यवहार डिजीटल पद्धतीनं केले जातात. यूपीआयद्वारे काही सेकंदामध्ये पेमेंट केलं जातं. मात्र, अनेकदा पैसे चुकीच्या बँक खात्यात किंवा यूपीआय आयडीवर वर्ग केले जातात.

Wrong UPI Transfer Refund : चुकीच्या यूपीआय आयडीवर गेलेले पैसे कसे मिळवायचे?

पैसे चुकीच्या खात्यात गेल्यास लोक घाबरतात. मात्र, घाबरुन जाण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही. जर पैसे चुकीच्या खात्यात गेले तर तुम्ही पहिल्यांदा काही गोष्टी करण्याची गरज आहे. योग्यवेळी निर्णय घेतल्यास तुम्हाला पैसे परत मिळू शकतात. यासंदर्भातील प्रक्रिया जाणून घेणं आवश्यक आहे.

जर पैसा चुकीच्या बँक खात्यात वर्ग झाले तर तुम्ही तातडीनं बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क केला पाहिजे.यासह ट्रांझॅक्शन आयडी आणि पाठवण्यात आलेल्या रकेमची पूर्ण माहिती द्यावी. यानंतर बँक अधिकारी या प्रकरणाची चौकशी करतील आणि योग्य खात्यातून पैसे परत मिळवण्याची प्रक्रिया सुरु होईल. त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रं ज्यामध्ये बँक स्टेटमेंट आणि स्क्रीनशॉट देखील तयार ठेवावे लागतील. यामुळं प्रक्रिया वेगवान होते. जितक्या लवकर तुम्ही तक्रार कराल तितक्या लवकर तुमचे पैसे परत मिळू शकतात.

चुकीच्या यूपीआय व्यवहाराची तक्रार कशी करायची?

आजकाल लोक साधारणपणे पेमेंट करण्यासाठी यूपीआयचा वापर करतात. मात्र, अनेकदा लोक पेमेंट करताना काळजी घेत नाहीत, त्यामुळं चुकीच्या यूपीआय आयडीवर पैसे वर्ग केले जातात. जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात वर्ग झाले असतील तर पहिल्यांदा यूपीआय ॲपमधून तक्रार नोंदवा. त्यानंतर ॲपच्या कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क करा आणि व्यवहाराची पूर्ण माहिती द्या.

याशिवाय एनपीसीआय म्हणजेच नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे देखील तक्रार करु शकता. तुम्ही जितक्या लवकर तक्रार कराल तितक्या लवकर पैसे परत मिळू शकतात. जर 30 दिवसात मार्ग निघाला नाही तर तुम्ही एनपीसीआयच्या टोल फ्री क्रमांकावर 18001201740 किंवा upihelp@npci.org.in वर तक्रार करु शकता.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Samruddhi Highway Crime: 'रात्रीचा फायदा घेतला...', पुण्याहून घरी जाणाऱ्या महिलेची पेट्रोल पंपावर छेड
Chhatrapati Sambhajinagar : देवदर्शनासारखी फटाक्यांसाठी गर्दी, फटाक्यांसाठी पहाटेपासून रांगा, खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड
Matheran Mystery: बंगळूरुचे प्रोफेसर Shanmukha Balasubramaniam यांचा मृत्यू; घातपात की अपघात, कारण अस्पष्ट
Rohit Pawar Protest : शेतकरी कर्जमाफीसाठी रोहित पवारांचे देहूत तुकाराम महाराजांच्या मंदिरासमोर उपोषण
Bacchu Kadu : शेतकऱ्यांनी जीवन संपवण्यापेक्षा आमदाराला कापा; बच्चू कडू आक्रमक

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gondia News : माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
माजी वित्तमंत्री महादेवराव शिवनकर यांचे वृद्धापकाळाने निधन; जनसंघापासून भाजपाचे ज्येष्ठ नेते असा राजकीय प्रवास
Pune Shaniwar wada: शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
Shahid Afridi : आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
आपण मुस्लिम, उपकार विसरलात का?; अफगाणिस्तानने पाकिस्तानसोबत खेळण्यास नकार देताच शाहीद अफ्रिदी संतापला, काय काय म्हणाला?
Harmanpreet Kaur Ind vs Eng : पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
पुन्हा एकदा पराभव! आता कर्णधार हरमनप्रीतने कोणावर फोडले पराभवाचे खापर? म्हणाली, स्मृतीची विकेट...
Bihar Election : बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राजद आमने सामने, महागठबंधनमध्ये 11 जागांवर तिढा, पेच वाढला 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
धक्कादायक! साताऱ्यात जमिनीच्या वादातून एकावर जीवघेणा हल्ला, परिसरात भीतीचं वातावरण 
Bacchu Kadu: संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
संभाजी महाराजांनी वतनदारी बंद केल्यामुळे ते सासऱ्याकडून मारले गेले, औरंगजेब उगाच बदनाम झाला: बच्चू कडू
Bacchu Kadu : अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
अरे स्वतःला संपवण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापूx टाका; शेतकरी हक्क राज्यव्यापी परिषदेत बच्चू कडूंचा प्रहार, म्हणाले..
Embed widget