एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
8 कोटी 70 लाख फेसबुक युझर्सच्या डेटाचा गैरवापर!
फेसबुकने स्वत: स्पष्टीकरण देत, सुमारे 8 कोटी 70 लाख युजर्सची डेटा चोरी झाल्याचं मान्य केलं आहे.
नवी दिल्ली: आपला खासगी डेटा सुरक्षित आहे का? फेसबुकच्या केम्ब्रिज अनालिटिका डेटा स्कँडलमुळे हा प्रश्न सध्या जगभर उपस्थित होत आहे. याबाबत फेसबुकने स्वत: स्पष्टीकरण देत, सुमारे 8 कोटी 70 लाख युजर्सची डेटा चोरी झाल्याचं मान्य केलं आहे.
ज्या युझर्सचा डेटा वापरण्यात आला आहे, त्यातील बहुसंख्य हे अमेरिकन आहेत.
केम्ब्रिज अनालिटिकाने फेसबुक युजर्सचा खासगी डेटा अमेरिकेच्या राष्ट्रपती निवडणुकीत वापरल्याचा आरोप आहे.
फेसबुकचा अधिकारी माईक स्क्रोफरच्या मते, “8 कोटी 70 लाख लोकांचा डेटा केम्ब्रिज अनालिटिकाने चुकीच्या पद्धतीने शेअर केला. यातील बहुसंख्य लोक हे अमेरिकन नागरिक आहेत. मात्र सध्या युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी फेसबुक कडक पावलं उचलत आहे”
फेसबुकने ‘प्रायव्हसी टूल्स’ आणलं आहे. गेल्या महिन्यात याची घोषणा केली होती. शिवाय केंब्रिज अनालिटिकासोबत कोणताही डेटा शेअर झाला असेल, तर त्याची माहिती युझर्सला देऊ, असंही स्क्रोफर म्हणाले.
काय आहे फेसबुक डेटा लीक प्रकरण?
2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे.
ब्रिटनस्थित केम्ब्रिज अॅनालिटिका कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत कशाप्रकारे मदत केली, यासंदर्भात अमेरिकन आणि युरोपियन खासदारांनी 'फेसबुक इंक'कडे उत्तर मागितले आहे.
एकंदरीत फेसबुकवरील वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’
डेटा घाटोळ्यानंतर लाखो युझर्सनी फेसबुकला रामराम ठोकला आहे. चौथ्या तिमाहीत अमेरिका आणि कॅनडात फेसबुक युजर्सची संख्या तब्बल एक कोटीने घटली आहे.
अमेरिकन राष्ट्रपती निवडणुकीच्या काळात पाच कोटी युजर्सची माहिती फेसबुककडून लीक झाली होती. या काळात गमावलेला युजर्सचा विश्वास फेसबुकला अद्याप संपन्न करता आलेला नाही. याचा परिणाम फेसबुक युजर्सच्या संख्येवर होताना दिसत आहे.
सोमवारी फेसबुकच्या संपत्तीत 37 अब्ज डॉलरची घट झाली. फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांनाही 6.6 अब्ज डॉलरचं नुकसान सहन करावं लागलं आहे. अमेरिका आणि युरोपमधल्या काही देशांत फेसबुकची चौकशीही सुरू आहे.
संबंधित बातम्या
आमची चूक झाली, मार्क झुकरबर्गचा माफीनामा
फेसबुक लीक : भारतातील कुठल्या पक्षाचे हात दगडाखाली?
'डेटा चोर काँग्रेस'... फेसबुकच्या डेटा लीकचे भारतात पडसाद
डेटा लीक प्रकरणानंतर फेसबुकवरुन लाखो युजर्स ‘लॉग आऊट’ फेसबुकला दणका, एका दिवसात 395 अब्ज रुपयांचं नुकसान वेळ आलीय, फेसबुक डिलीट करा : व्हॉट्सअॅप सहसंस्थापक तुमची खासगी माहिती फेसबुक कसं चोरतं आणि कुणाला देतं?अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement