Electricity Bill : उन्हाळ्यात एसी चालवताना वीज बिल कमी करण्यासाठी फॉलो करा 'या' 5 सोप्या टिप्स...
Electricity Bill : तुमचे वाढते वीज बिल कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.
Electricity Bill : उन्हाळ्याचा तडाखा महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला जाणवतोय. भारतातील बहुतेक भागांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे अनेकांची पसंती एअर कंडिशनरला मिळते. थोड्या वेळासाठी का होईना पण एसीची थंडगार हवा सुखकर असते. एसी हा उष्णतेवर मात करण्याचा सर्वोत्तम मार्ग जरी असला तरी एसी ही महागच आहे. एसीला जास्त वीज लागते, ज्यामुळे संपूर्ण उन्हाळ्यात वीज बिल वाढते. तुमचे वाढते वीज बिल कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्स आहेत.
नियमित सर्व्हिसिंग करा
सर्वात महत्वाची बाब म्हणजे तुम्ही एसीची सर्व्हिसिंग वेळेवर करा. एसी चालू करण्यापूर्वी उन्हाळ्यात एकदा एसी सर्व्हिसिंग करणे आवश्यक आहे. जर तुम्ही एसी जास्त वापरत असाल तर 3 महिन्यांनंतर एकदा सर्व्हिसिंग करा. सर्व्हिसिंगमध्ये एसीवरील कॉइल साफ केल्या जातात, व्होल्टेज कनेक्शन आणि कूलिंग लेव्हल तपासली जाते.
कोणतीही गळती नाही याची खात्री करा
विंडो एसीमध्ये ही एक सामान्य समस्या आहे. काही वेळा, एसी आणि खिडकीच्या फ्रेममध्ये काही जागा राहते, ज्यामुळे कूलिंग क्षमता खराब होते.
टायमिंग सेट करा
अनेक वेळा लोक वीज वाचवण्यासाठी एसी चालू आणि बंद करत राहतात. यासाठी, वापरकर्ते एक टायमर सेट करू शकतात जे काही वेळाने एसी स्वयंचलितपणे बंद करेल.
कट-ऑफ तापमानावर चालवा
एअर कंडिशनरला कट ऑफ तापमानावर ठेवणे म्हणजे खोलीत प्रवेश करताच एसी बंद होईल असे तापमान सेट करणे. उदाहरणार्थ, AC 24 अंशांच्या कट-ऑफ तापमानावर असल्यास, 24 अंश तापमानावर पोहोचताच AC कट होईल. जेव्हा खोलीचे तापमान वाढेल तेव्हा ते आपोआप कॉम्प्रेसर सुरू करेल.
एअर फिल्टर्स नियमितपणे स्वच्छ करा
तुमच्या एसीमधील एअर फिल्टर्स HVAC सिस्टीममधील धूळीपासून दूर ठेवतात. ज्यामुळे ते सहजतेने वापरले जाऊ शकते. जरी एअर फिल्टर नेहमी धूळ नियंत्रित ठेवत असले तरी ते वेळोवेळी घाण होते आणि ते स्वच्छ करण्याची शिफारस केली जाते. एसी एअर फिल्टर स्वच्छ करण्यासाठी फक्त पाण्याने धुवा.
महत्वाच्या बातम्या :
- आता 'व्हॉइस कमांड'वर धावणार स्कूटर, TVS ने लॉन्च केले Smart Scooter; पाहता येणार कुठे आहे ट्राफिक
- OnePlus Nord CE 2 Lite 5G : अवघ्या 20 हजारांत खरेदी करता येणार ‘वन प्लस’चा नवा स्मार्ट फोन! जाणून घ्या खास फीचर्स...
- Xiaomi 12 Pro : दमदार फीचर्स, 120W फास्ट चार्जिंगसह Xiaomi 12 Pro भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत