एक्स्प्लोर
आधार नंबर द्या आणि नवीन सिम घ्या, ई-केवायसीला मंजुरी

नवी दिल्लीः केंद्र सरकारने नवीन सिम कार्ड घेण्यासाठी आधार ई-केवायसीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्राहकांची कागदपत्रांच्या त्रासातून मुक्ती होणार असून केवळ आधार नंबर आणि फिंगरप्रिंटवरच सिम घेता येणार आहे.
नवीन सिम घेण्याच्या जाचक अटींमधून ग्राहकांची सुटका करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचललं आहे. ग्राहक आणि कंपन्या या दोघांनाही या नियमाचा फायदा होणार आहे.
काय आहे नवीन प्रणाली?
नवीन सिम सक्रिय करण्यासाठी पडताळणीचे नियमही आता सोपे होणार आहे. फिंगरप्रिंट आणि आधार नंबरच्या आधारावर टेलिफोन कंपनीला ग्राहकांची माहिती मिळते. त्यामुळे इतर कागदपत्रांची गरज लागत नाही. आधार प्रणालीकडूनच कंपन्यांना ग्राहकांचा सर्व तपशील मिळणार आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पुणे
क्राईम
क्राईम
























