एक्स्प्लोर
विमान प्रवासात सॅमसंग गॅलक्सी नोट-7च्या वापरावर बंदी
नवी दिल्ली: भारत सरकारनं स्मार्टफोन कंपनी सॅमसंगला एक मोठा धक्का दिला आहे. नागरी उड्डाण मंत्रालयानं नुकताच लाँच केलेला स्मार्टफोन गॅलक्सी नोट-7ला विमान प्रवासात वापरण्यास बंदी घातली आहे. विमान प्रवास करताना हा फोन वापरु नये किंवा चार्जिंगही करु नये. असा सल्ला सरकारकडून देण्यात आला आहे.
सॅमसंग गॅलक्सी नोट-7 बॅटरीचा स्फोट होत असल्याच्या काही बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत आहेत. या बातम्यांनंतर सॅमसंगनं या स्मार्टफोनच्या विक्रीवर बंदी घातली असून याआधी विक्री करण्यात आलेले स्मार्टफोन परत मागवून घेतले आहेत.
या प्रकारानंतर अमेरिका फेडरल एव्हिएशन अॅडमिनिस्ट्रेशननं विमान प्रवासात या फोनच्या वापरावप बंदी घातली. त्यानंतर भारत सरकारनंही कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी अशाच पद्धतीचं पाऊल उचललं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement