(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cheapest 7 Seater Cars: सर्वात स्वस्त 7 सीटर फॅमिली कार; वाचा किंमत आणि फीचर्स
काही कारच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या 7 सीटर कारबद्दल जाणून घेऊयात.
मुंबई : गेल्या काही वर्षांत फॅमिली कारच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे. या कारमध्ये शक्तिशाली इंजिनसह अधिक जागा देखील उपलब्ध असते. मार्केटमध्ये अनेक 7 सीटर कार आहे. मात्र काही कारच्या किंमती सर्वसामान्यांच्या बजेटच्या बाहेर आहेत. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या परवडणाऱ्या 7 सीटर कारबद्दल जाणून घेऊयात.
रेनॉल्ट ट्रायबर (Renault Triber)
अल्पावधीतच या कारने बाजारात आपले स्थान निर्माण केले आहे. या कारमध्ये 1.0 लिटरचे 3-सिलेंडर पेट्रोल इंजिन बसवण्यात आले आहे. इंजिन जास्तीत जास्त 70bhp ची पॉवर आणि 96 Nm चा पीक टॉर्क जनरेट करतो. कारला 5 स्पीड एएमटीसह 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. या कारची एक्स शोरूम किंमत जवळपास साडे सहा लाखांपर्यंत आहे.
मारुती सुझुकी इको (Maruti Suzuki Eeco)
मारुती सुझुकीची ही कार कार व्यावसायिक आणि घरगुती वापरासाठी वापरली जाते. फॅमिली कार म्हणून ही कार योग्य पर्याय आहे. यात आपण संपूर्ण कुटुंबासोबत आरामात प्रवास करू शकता. कारमध्ये 2 लिटरचे चार सिलेंडर पेट्रोल इंजिन दिले गेले आहे. इंजिन 73 बीएचपीची जास्तीत जास्त पॉवर आणि 101 एनएमची पीक टॉर्क जनरेट करते. इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सवर अटॅच केले आहे. या कारची एक्स शोरुम किंमत पाच लाखांपर्यंत आहे.
डॅटसन गो प्लस (Datsun Go Plus)
या कारला लोकप्रिय मल्टीपर्पज गाडी म्हणून ओळखलं जातं. म्हणजेच, एक वाहन जे आपण आपल्या गरजेनुसार आणि सोयीनुसार अनेक मार्गांनी वापरू शकता. यात लाइन 4 वॉल्व्ह डीओएचसी पेट्रोल इंजिनमध्ये 1198 सीसी 3 सिलेंडर आहे. कारमध्ये अँटी-लॉक ब्रेकिंग, ड्युअल फ्रंट एअरबॅगचा समावेश आहे. या कारची एक्स शोरुम किंमत साडेचार लाख रुपयांपर्यंत आहे.
इतर संबंधित बातम्या
- Best Mileage Bikes : उत्तम मायलेज आणि खिशालाही परवडणाऱ्या बाईक; पाहा किंमत आणि फीचर्स
- इंधन परवडत नाही; सोप्या टिप्स वापरुन गाडीचं मायलेज वाढवा
- Electric Cars | देशात 'या' इलेक्ट्रिक कारच्या मागणीत वाढ, काय आहेत फीचर्स आणि किंमत?