एक्स्प्लोर

इंधन परवडत नाही; सोप्या टिप्स वापरुन गाडीचं मायलेज वाढवा

नियमित देखभाल व सर्विसिंगमुळे वाहनाचे मायलेज वाढण्यास मदत होते. जेव्हा कार पार्क कराल तेव्हा इंजिन बंद करा.

पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. अशा परिस्थितीत जास्त मायलेज देणारी वाहने लोकांचे लक्ष वेधून घेत आहेत. तसेच इंधनाची बचत हा देखील दुसरा पर्याय आहे. काही सोप्या पद्धतींचा अवलंब करून आपल्या कारची किंवा बाईकचे मायलेज वाढवता येऊ शकते.

नियमित देखभाल करा

  • नियमित देखभाल व सर्विसिंगमुळे वाहनाचे मायलेज वाढण्यास मदत होते.
  • इंजिन आणि गिअरबॉक्स सारख्या वाहनांच्या सतत फिरणाऱ्या भागांना लुब्रिकेशनची आवश्यकता असते. आपण हे न केल्यास ते मायलेजवर परिणाम होतो.
  • सर्व्हिस ऑईल चेंज, कूलंट ऑइल लेव्हल, चेन लुब्रिकेशन याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

टायरमधील एअर प्रेशर

  • टायरमधील एअर प्रेशरकडे लक्ष दिले पाहिजे.
  • टायरवर जास्त दबाव येऊ नये.
  • मॅन्युफॅक्चररच्या सूचनेनुसार टायरमध्ये हवा भरली पाहिजे.
  • जास्त भार किंवा वजन असल्यास, गाडीचं हँडबुक वाचा आणि त्यानुसार टायरची हवा चेक करा.

कार पार्क करताना इंजिन बंद करण्यास विसरू नका

  • जेव्हा कार पार्क कराल तेव्हा इंजिन बंद करा.
  • जर आपल्याला ट्रॅफिकमध्ये 10 सेकंदांपेक्षा जास्त वेळ थांबायचे असेल तर गाडी बंद केली पाहिजे.
  • इंजिन सुरू केल्यास अधिक इंधन खर्च होते हा गैरसमज दूर करा.

क्लचचा वापर कमी करा

  • जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच क्लच वापरा.
  • क्लचचा जास्त वापर केल्यास जास्त इंधन वापरले जाते.
  • जास्त क्लचचा वापर केल्यास क्लच प्लेटदेखील खराब होऊ शकते.

योग्य गियर वापरा

  • वाहन चालवताना लोअर गियर वापरा आणि हळूहळू तो वाढवा. यामुळे इंजिनवर ताण येत नाही.
  • वाहनच्या इंजिननुसार गिअर देखील वापरावे.
  • 150 सीसी इंजिन असणार्‍या वाहनास 55 किमी प्रति तासाच्या वेगाने थर्ड गिअरने चालवले जावे. यावर जाण्याने इंजिनवर ताण येईल जे माइलेजवर परिणाम करेल.

ट्रॅफिकची माहिती ठेवा

  • वाहन चालवताना ट्र्रॅफिकची माहिती ठेवा.
  • आजकाल स्मार्ट फोन आणि रेडिओ स्टेशनवर ट्रॅफिकचे अलर्ट येतात.
  • या माहितीच्या आधारे आपल्या रुटचा प्लान केल्यास बरेच इंधन वाचू शकते.

जीपीएस वापर

  • जीपीएसच्या वापरामुळे वाहनचे मायलेज वाढवण्यात मदत होऊ शकते.
  • कोणत्या मार्गावर जास्त ट्रॅफिक आहे हे शोधण्यासाठी जीपीएसचा वापर होऊ शकतो.
  • जीपीएसद्वारे कमी अंतराचा रुट शोधला जाऊ शकतात. यामुळे वाहनाचे मायलेजही वाढते.

इंधन कधी भरायचे

  • सकाळी किंवा रात्री उशिरा गाडीमध्ये इंधन भरले पाहिजे.
  • गरम झाल्यावर इंधन पसरते आणि थंड झाल्यावर दाट होते.
  • दुपारी किंवा संध्याकाळी तेल भरण्याऐवजी सकाळी किंवा रात्री उशिरा ते भरले तर फायदा होईल.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'

व्हिडीओ

Special Report BJP Won Mahapalika : राज्यात अनेक महापालिकांमध्ये भाजपच्या विजयाचं 'कमळ' फुललं
Ganesh Naik Special Report : गणेश नाईकांचा विजय, विरोधकांचा टांगा पलटी घोडा फरार
Sambhajinagar Municipal Election Result : संभाजीनगरमध्ये ठाकरे नाही तर शिंदेंनाच भाजपचा मोठा धक्का
Ganesh Naik On Navi Mumbai : हा नवी मुंबईच्या जनतेचा विजय, गणेश नाईकांची पहिली प्रतिक्रिया
Eknath Shinde On BMC : मुंबई महापालिकेची सत्ता युतीलाच मिळणार, एकनाथ शिंदेंचा शब्द

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray BMC Election Result 2026: राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; सर्व मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
राज ठाकरेंना अखेर गुलालाने माखवलं; मनसैनिकांच्या डोळ्यात पाणी आणणारे शिवतीर्थावरील आठ PHOTO
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
जालन्यात विजयी पराभूत समर्थक एकमेकांना भिडले, लाठ्याकाठ्यांनी मारहाण, 6-7 जण जखमी, नेमकं काय घडलं?
Maharashtra All 29 Municipal Corporation Result 2026: 29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर...
29 महापालिका, 29 महापौर, कोणत्या महापालिकेत कुणाची सत्ता; संपूर्ण निकाल, एका क्लिकवर
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
'फूट पडणारा चित्रपट..' ए आर रहमान छावा चित्रपटावरून स्पष्टच बोलले, म्हणाले 'चुकीच्या हेतूने काही चित्रपट...'
Nagpur Election Results 2026: CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
नागपूर महानगरपालिका निवडणूक 2026 : CM फडणवीसांच्या बालेकिल्ल्यात 'अशी' झाली लढत, पाहा प्रभाग निहाय विजयी उमेदवारांची यादी एकाच क्लिकवर
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
शिवतीर्थ बंगल्याबाहेर गुलाल, विजयी उमेदवारास राज ठाकरेंचा फ्लाईंग किस; उद्धव ठाकरेंची 'मन की बात'
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
राज्यात MIM ची जोरदार मुसंडी, तब्बल 125 उमेदवार विजयी, छ. संभाजीनगरमध्ये 33 उमेदवार जिंकले
BMC Election : ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
ठाकरेंची 25 वर्षांची सत्ता उलथवणारे भाजपचे शिलेदार; पाहा विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी
Embed widget