एक्स्प्लोर
तुमची माहिती कुणाला द्यायची तुम्हीच ठरवा, फेसबुकचे नवे बदल!
फेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवू शकतात. कुठली वेबसाईट आपली माहिती वापरु शकते, हे आता युजर्सच्या हातात असेल.
![तुमची माहिती कुणाला द्यायची तुम्हीच ठरवा, फेसबुकचे नवे बदल! changes in facebook india for information security reason तुमची माहिती कुणाला द्यायची तुम्हीच ठरवा, फेसबुकचे नवे बदल!](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/04/20175046/mark-zuckerberg-facebook.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : केम्ब्रिज अॅनालिटिकामुळे फेसबुक युजर्सच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. आता ही विश्वासार्हता पुन्हा मिळवण्यासाठी फेसबुकने पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केम्ब्रिज अॅनालिटिका प्रकरणाशी भारताचाही संबंध जोडला गेला होता. त्यामुळे फेसबुकने भारतातील युजर्सना विश्वास देण्यासाठी अॅपमध्ये काही बदल करुन, युजर्सच्या माहितीला अधिक सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.
फेसबुकच्या नव्या बदलांमुळे युजर्स फेसबुकच्या माध्यमातून शेअर होणाऱ्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवू शकतात. कुठली वेबसाईट आपली माहिती वापरु शकते, हे आता युजर्सच्या हातात असेल. युजर्सच्या परवानगीशिवाय वैयक्तिक माहितीचा वापर इतर कुणालाही फेसबुकच्या माध्यमातून वापरता येणार नाही. त्यासाठीच फेसबुकने काही महत्त्वाचे बदल अॅपमध्ये केले आहेत.
कोणत्या वेबसाईटला तुमच्या माहितीचा अॅक्सेस द्यायचा, हे कसे ठरवाल?
- फेसबुक अकाऊंट लॉग इन करा.
- सेटिंगमध्ये जा.
- डाव्या बाजूस असलेल्या 'Apps and Websites' या पर्यायवार क्लिक करा.
- तिथे अॅक्टिव्ह, एक्स्पायर्ड आणि रिमूव्ह्ड असे तीन पर्याय दिसतील.
- अॅक्टिव्ह पर्यायाखाली असलेल्या वेबसाईट्सना तुम्ही माहिती शेअर करत आहात. त्यातील नको असलेल्या वेबसाईट सिलेक्ट करुन रिमूव्ह करता येतात.
- पुढे एक्स्पायर्ड पर्याय आहे. त्यात अर्थात एक्स्पायर्ड वेबसाईट्स असतात. त्याही रिमूव्ह करता येतात.
- पुढे रिमूव्ह्ड पर्याय आहे. तिथे तुम्ही परवानगी नाकारलेल्या सर्व वेबसाईट्स दिसतात.
काय आहे प्रकरण?
2017 साली अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना मदत करणाऱ्या 'केम्ब्रिज अॅनालिटिका' या कंपनीने जवळपास 5 कोटी फेसबुक यूजर्सची वैयक्तिक माहिती चोरली, असा आरोप करण्यात आला होता. या चोरलेल्या माहितीचा निवडणुकीत वापरही केला, असाही आरोप आहे.
केम्ब्रिज अॅनालिटिका ही ब्रिटनस्थित कंपनी आहे. या कंपनीमुळेच फेसबुकवरील युजर्सच्या माहितीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
भारत
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)