एक्स्प्लोर
‘फ्रीडम 251’नंतर आता ‘चॅम्पवन C1’, किंमत फक्त...
मुंबई : रिंगिंग बेल्सच्या 'फ्रीडम 251' स्मार्टफोनने भारतातील स्मार्टफोनप्रेमींमध्ये धुमाकूळ घातला. अवघ्या 251 रुपयांत रिंगिंग बेल्सने स्मार्टफोन उपलब्ध करुन दिला. आता असाच पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यासाठी ‘चॅम्पवन’ कंपनी तयार झाली आहे. या कंपनीने आपला ‘चॅम्पवन C1’ स्मार्टफोन लॉन्च केला असून, या स्मार्टफोनची किंमत फक्त 501 रुपये आहे.
चॅम्पवन कंपनीने आपल्या ऑफिशियल वेबसाईटवर स्मार्टफोनचं रजिस्ट्रेशनही सुरु केलं आहे. मात्र, सध्या पेमेंटबाबत काही टेक्निकल इश्यू असल्याने रजिस्ट्रेशन काही काळासाठी बंद ठेवण्यात आले आहे. जे ग्राहक वेबसाईटवरुन रजिस्ट्रेशन करतील, त्यांनाच फ्लॅश सेलमध्ये सहभागी होता येणार आहे. शिवाय, कॅश ऑन डिलिव्हरीचाही पर्याय कंपनीने दिला आहे.
‘चॅम्पवन C1’ स्मार्टफोनचे फीचर्स :
- 5 इंचाचा HD डिस्प्ले
- 3GHz प्रोसेसर
- 2 जीबी रॅम
- 8 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा
- 5 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा
- फिंगरप्रिंट सेन्सर
- व्हाईट, सिल्हर आणि गोल्ड कलर व्हेरिएंट
- LiPo 2500 mAh क्षमतेची बॅटरी
- 16 जीबी इंटरनल स्टोरेज
- ड्युअल सिम
- 4G LTE
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement