Electric Vehicle : इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सरकारकडून मोठी घोषणा
इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने अनुदान आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे.
मुंबई : पेट्रोल,डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे त्रस्त झाल्यानंतर अनेकजण इलेक्ट्रिक दुचाकी (Electric Vehicle) खरेदी करण्याचा विचार करत आहेत. तुम्हीही असा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण लवकरच इलेक्ट्रिक दुचाकींची किंमत कमी होणार आहे. खरंतर इलेक्ट्रिक दुचाकींना सरकारकडून सुरु करण्यात आलेल्या सबसिडी स्कीममधून एवढा चांगला प्रतिसाद मिळाला नाही ज्याची सरकारला अपेक्षा होती. म्हणूनच इलेक्ट्रिक दुचाकींच्या विक्रीला चालना देण्याच्या उद्देशाने सरकारने अनुदान आणखी वाढवण्याची घोषणा केली आहे.
म्हणून किंमती कमी होणार
फास्टर अॅडॉप्शन अॅँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल इन इंडिया फेज (FAME India Phase II) मध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार इलेक्ट्रिक दुचाकीवरील डिमांड इन्सेटिव्ह प्रति किलोवॅट 10 हजार रुपये वरून 15000 रुपये प्रति किलोवॅट करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना लागू होणारी इन्सेटिव्ह कॅप त्यांच्या किंमतीच्या 40 टक्के करण्यात आली आहे. बंगळुरुस्थित अॅथर एनर्जीने म्हटले की, सरकारच्या या निर्णयानंतर अॅथर 450X ला 14,500 रुपयांचे अतिरिक्त अनुदान मिळणार आहे.
योजनेंतर्गत विकले गेलेली वाहने
इलेक्ट्रिक व्हेइकल्स ऑफ सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स (SMEV) च्या नुकत्याच जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, डिसेंबर 2020 पर्यंत विक्री झालेल्या एकूण 10 लाख इलेक्ट्रिक दुचाकींपैकी केवळ तीन टक्के सरकारने अशा आहेत की ज्या सरकारकडून 2019 मध्ये लॉन्च करण्यात आलेल्या FAME India Phase II योजनेअंतर्गत विक्री केली. ही योजना सुरू झाल्यापासून डिसेंबर 2020 पर्यंत, 31,813 इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री झाली आहे. तर जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत हाय-स्पीड इलेक्ट्रिक दुचाकींची विक्रीची संख्या 25,735 इतकी झाली आहे. जे की 2019 च्या 27,224 आकडेवारीच्या पाच टक्के कमी आहे.
फेम 2 अंतर्गत खर्च झालेले पैसे
फेम २ अंतर्गत इलेक्ट्रिक दुचाकीची किमान ड्राईव्ह रेंज 80 किमी, जास्तीत जास्त वेग 40 किमी/तास आणि फुल चार्जसाठी आठ युनिट्सची उर्जा वापरावी. फेम 2 वर खर्च होणार्या अंदाजे 10 हजार कोटी रुपयांपैकी केवळ पाचशे कोटी रुपये खर्च झाले आहेत.