एक्स्प्लोर
शाओमी रेडमी नोट 4 स्मार्टफोन अवघ्या एका रुपयात!
मुंबई: शाओमी येत्या बुधवारी भारतात Mi Fan Festival आयोजित करणार आहे. 6 एप्रिलला कंपनीनं एक रुपयांच्या फ्लॅश सेलचं आयोजन केलं आहे. याशिवाय अनेक डिव्हाईसवर डील आणि ऑफरही आहेत.
एक रुपयाच्या फ्लॅश सेलमध्ये भाग घ्यायचा असल्यास तुमच्याकडे शाओमीचं अॅप असणं गरजेचं आहे. हा सेल बुधवारी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आहे. यामध्ये तुम्ही रेडमी नोट 4, Mi बँड 2 आणि 10000 एमएएच पॉवरबँक हे फक्त एक रुपयात खरेदी करु शकतात. याशिवाय 3 एप्रिल ते 5 एप्रिलमद्ये दररोज सकाळी 10 वाजेपासून 50 रु., 100 रु., 200 रु., आणि 500 रुपयांपर्यंतचे डिस्काउंट कूपन मिळवू शकतात. तसेच एसबीआयच्या डेबिट कार्डधारकांना 5,000च्या खरेदीवर 5 टक्के सूट मिळेल.
बुधवारी दुपारी 12 वाजता शाओमी रेडमी नोट 4चा देखील सेल होणार आहे. Mi फॅन फेस्टिव्हलमध्ये Mi इन इअर हेडफोन प्रो वर 200 रु. डिस्काउंट मिळणार आहे. त्यामुळे ते 1599 रु. खरेदी करणार आहे.
याशिवाय या सेलमध्ये शाओमी Mi मॅक्स प्राइम स्मार्टफोन 19,999 रुपयात उपलब्ध असणार आहे. हा फोन तुम्ही ईएमआयवर देखील खरेदी करु शकतात.
संबंधित बातम्या:
शाओमी Redmi 4Aचा नवा विक्रम, 4 मिनिटात 250,000 फोन सोल्ड आऊट
शाओमीचा मोस्ट अवेटेड स्मार्टफोन Mi6चं 11 एप्रिलला लाँचिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement