एक्स्प्लोर
जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनलचा मेगाप्लॅन !
![जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनलचा मेगाप्लॅन ! Bsnl Offer 2gb Data Per Day With Unlimited Calls जिओला टक्कर देण्यासाठी बीएसएनलचा मेगाप्लॅन !](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/17130731/Capture43-580x395.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नवी दिल्ली : रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी इतर टेलिकॉम कंपन्यांसोबतच सार्वजनिक क्षेत्रातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपनी बीएसएनएलनेही नवीन प्लॅन लॉन्च केला आहे. या प्लॅननुसार बीएसएनएल यूजर्सना रोज 2 जीबी 3G डेटा मिळणार आहे. एवढच नव्हे, तर बीएसएनएल टू बीएसएनएल अनलिमिटेड कॉलिंग करु शकतात. बीएसएनएल युजर्सना या प्लॅनसाठी महिन्याला 339 रुपये मोजावे लागतील.
“बीएसएनलचे ग्राहक रोज 2 जीबी डेटा वापरु शकतात. या प्लॅनची मुदत 28 दिवस असेल. याशिवाय, बीएसएनएल नेटवर्कअंतर्गत कॉलिंगसाठी 339 रुपयांची कॉम्बो ऑफरही देण्यात आली आहे.”, असे बीएसएनएलकडून माहिती देण्यात आली आहे.
रिलायन्स जिओ आपल्या ग्राहकांसाठी 1 एप्रिलपासून प्राईम मेंबरशिपची सुविधा सुरु करत आहे. जिओच्या प्राईम मेंबरशिपसाठी 99 रुपये द्यावे लागणार आहेत, त्यानंतर दर महिन्याला 303 रुपये मोजावे लागतील. रिलायन्स जिओची ही सुविधा 31 मार्च 2018 पर्यंतच उपलब्ध असेल.
रिलायन्स जिओ आपल्या वेगवेगळ्या प्लॅनमुळे ग्राहकांना आकर्षित करत आहे. जिओमुळे मोठमोठ्या टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणलेले असताना, सार्वजनिक क्षेत्रातील टेलिकॉम कंपनी बीएसएनलनेही जिओला टक्कर देण्याचा प्रयत्न केला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)