एक्स्प्लोर
BSNLचा नवा फीचर फोन लाँच, किंमत फक्त 499 रुपये
मोबाईल बाजारात फीचर फोनची सध्या बरीच चलती आहे. त्यामुळेच आता बीएसएनएलनं देखील आपला नवा फीचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत फक्त 499 रुपये आहे.

मुंबई : मोबाईल बाजारात फीचर फोनची सध्या बरीच चलती आहे. त्यामुळेच आता बीएसएनएलनं देखील आपला नवा फीचर फोन लाँच केला आहे. या फोनची किंमत फक्त 499 रुपये आहे. डिटेल या कंपनीच्या साथीनं बीएसएनएलनं डिटेल D1 हा स्मार्टफोन लाँच केला आहे.
जिओ आणि एअरटेलच्या फोनप्रमाणे या फीचर फोनमध्ये व्हॉईस कॉलिंग मिळणार आहे. या फोनसोबत बीएसएनएलचं सिम मिळणार असून पहिलं रिचार्ज वर्षभरासाठी वैध असणार आहे. हा प्लॅन 153 रुपयांचा असणार आहे. पण मोबाइलच्या किंमतीतच या प्लॅनची किंमत समाविष्ट असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या फोनसाठी फक्त 499 रुपयेच मोजावे लागतील.
या फोनवर 103 रुपयांचं टॉक टाइम मिळणार आहे. या प्लॅनमध्ये बीएसएनएल टू बीएसएनएल कॉलिंग 0.15 पैसे असणार आहे. तर इतर नेटवर्कसाठई 0.40 पैसे प्रति मिनिट चार्ज असणार आहे.
बीएसएनएल डिटेल D1 हा एक बेसिक फोन आहे. हा फोन कॉलिंग आणि मेसेज यासाठी तयार करण्यात आला आहे. हा फीचर फोन जिओप्रमाणे डेटा केंद्रीत नाही. या फोनमध्ये 1.4 इंच स्क्रीन आहे. तसेच हा फोन सिंगल सिम सपोर्ट आहे. या फोनची बॅटरी 650 mAh आहे. या फीचर फोनमध्ये एफएम रेडिओ, स्पीकर, टॉर्च यासारखे फीचर देण्यात आले आहेत.
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
क्रिकेट
व्यापार-उद्योग
व्यापार-उद्योग
Advertisement
Advertisement
























