एक्स्प्लोर
BlackBerryची मोठी घोषणा, दोन नवे बजेट स्मार्टफोनचं लवकरच लाँचिंग
मुंबई: स्मार्टफोन कंपनी ब्लॅकबेरी दोन नवे मिडरेंज स्मार्टफोन लाँच करणार आहे. कंपनीचे सीईओ जॉन चेन यांनी याबाबत एका मुलाखतीत याची घोषणा केली. मात्र, नेमकं कधी याचं लाँचिंग करण्यात येईल याविषयी माहिती देण्यात आली नाही.
रिपोर्टनुसार, एक फूल टच स्क्रिन आणि दुसरा स्मार्टफोन क्वेटी की बोर्ड असणार आहे. दोन्ही स्मार्टफोनची किंमत 300 डॉलर (जवळजवळ 20,000 रु) आणि 400 डॉलर (जवळजवळ 26,000) आहे.
प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन प्रिवविषयी बोलताना चैन म्हणाले की, हे कंपनीचं हाय-एंड डिव्हाइस आहे. ज्याच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.
मागील तीन महिन्यात प्रीमियम अँड्रॉईड स्मार्टफोन प्रिव 600,000 युनिटची विक्री करण्यात आली आहे. ब्लॅकबेरी प्रिवमध्ये 5.4 इंच 1440x2560 पिक्सल रेझ्युलेशन डिस्प्ले आहे. हेक्सा-कोअर क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 808 प्रोसेसर, 3 जीबी रॅम 32 जीबी इनबिल्ट स्टोरेज आहे.
18 मेगापिक्सल रिअर कॅमेरा, 2 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. अँड्रॉईड 5.1 लॉलीपॉप आणि 3जी, वायफाय आणि इतर कनेक्टिव्हीटी फीचर यात देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement