एक्स्प्लोर
अवघ्या काही तासात ब्लॅकबेरीच्या नव्या स्मार्टफोनचं लाँचिंग!
तरुणाईपासून कॉर्पोरेटपर्यंत ज्या ब्लॅकबेरीनं साऱ्यांनाच वेड लावलं होतं. त्याच ब्लॅकबेरीचा नवा स्मार्टफोन लवकरच बाजारात येत आहे.
मुंबई : मोबाइल विश्वात एकेकाळी धुमाकूळ घालणारी ब्लॅकबेरी कंपनी आता पुन्हा एकदा भारतीय बाजारात आपला नवा फोन घेऊन आली आहे. ब्लॅकबेरी आपला नवा स्मार्टफोन KEYone भारतात 1 ऑगस्ट म्हणजेच उद्या (मंगळवार) लाँच करणार आहे. ब्लॅकबेरी हक्क विकत घेणाऱ्या TCL कंपनीनं हा स्मार्टफोन तयार केला आहे.
ब्लॅकबेरीच्या नव्या स्मार्टफोनमध्ये 4.5 इंच फूल एचडी डिस्प्ले असणार आहे. तसेच यामध्ये 625 प्रोसेसरसोबत 3जीबी रॅम असणार आहे. तसेच यामध्ये 32 जीबी इंटरनल मेमरी असून एसडी कार्डनं 256 जीबीपर्यंत मेमरी वाढवता येणार आहे.
- या नव्या स्मार्टफोनमध्ये 12 मेगापिक्सल रिअर कॅमेरा तर 8 मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा असणार आहे.
- क्यूआरटी कीबोर्ड अशी ओळख असलेल्या ब्लॅकबेरीनं या स्मार्टफोनमध्येही आपल्या यूजर्ससाठी कीबोर्ड दिला आहे.
- या स्मार्टफोनमध्ये 3500 mAh बॅटरी असून यामध्ये 3.1 सी पोर्ट देण्यात आलं असून यामध्ये फास्ट चार्जिंग सपोर्ट असणार आहे.
दरम्यान, उद्या हा स्मार्टफोन लाँच होणार असून याची किंमत 40 हजारापर्यंत असण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement