एक्स्प्लोर
व्हॉट्सअॅपवर हॅकर्सची नजर, मुंबईत महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक
मुंबई: सोशल मीडिया अकाउंट आणि ई-मेल हॅक झाल्याचं आपण बऱ्याचदा ऐकतो. पण आता हॅकर्सनं थेट तुमच्या व्हॉट्सअॅपकडे मोर्चा वळवला आहे. मुंबईत अशीच एक घटना समोर आली आहे. या प्रकरणात हॅकर्सनं एका महिलेचं व्हॉट्सअॅप अकाउंट हॅक करुन तिच्या मित्राकडून पैशाची मागणी केली. तसंच या महिलेचं फेसबूक अकाउंटही हॅक करण्यात आलं. या प्रकरणी महिलेनं सायबर सेलमध्ये तक्रार नोंदवली आहे.
मुंबईतील महिलेचं व्हॉट्सअॅप हॅक
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या महिलेच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला ज्यामध्ये एक लिंक पाठवण्यात आली होती. मेसेज पाठवणाऱ्या हॅकर्सनं महिल्याच्या जवळील व्यक्तीचा फोटो आपला प्रोफाईल फोटो ठेवला होता. त्यामुळे महिलेनं त्या मेसेजवर विश्वास ठेवला आणि लिंक कॉपी-पेस्ट करुन मेसेजला उत्तर दिलं. यानंतर तिचं फेसबूक आणि व्हॉट्सअॅप हॅक झालं.
हॅकरकडून महिलेच्या मित्र आणि नातेवाईकांकडे पैशाची मागणी:
अकाउंट हॅक झाल्यानंतर हॅकरनं महिलेच्या अनेक नातेवाईक आणि मित्रांकडून तिच्याच प्रोफाईलच्या मदतीनं पैशांची मागणी केली. मला पैशांची खूप गरज आहे. त्यामुळे माझ्या पेटीएम अकाउंटमध्ये लवकरात लवकर 5000 रुपये टाका असा मेसेज हॅकरनं महिलेच्या मित्रांना टाकला.
'पोलीस मला पकडू शकत नाही', हॅकरची वल्गना
यानंतर महिलेच्या एका मैत्रिणीनं तिला फोन केला आणि याविषयी विचारणा केली. त्यानंतर महिलेनं मेसेज आलेल्या व्हॉट्सअॅप नंबरवर फोन केला. तेव्हा हॅकर तिला म्हणाला की, 'मला पोलीस अजिबात पकडू शकत नाही.' दरम्यान, याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहेत.
संबंधित बातम्या:
WhatsAppचं जुनं 'स्टेटस' फीचर पुन्हा येणार?
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement