(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Best Camera Phones : 108 मेगापिक्सलचे टॉप 5 स्मार्टफोन्स, किंमत 20 हजारांहून कमी
अधिक मेगापिक्सेल असलेले फोन महाग आहेत आणि प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाहीत. त्यामुळे आज 108 MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
Top 5 Camera Phones : स्मार्टफोनचा कॅमेरा उत्तम असेल तर तो फोन कमी वेळेत जास्त लोकप्रिय होतो. जर फोनमध्ये अधिक मेगापिक्सेलची लेन्स असेल तर ते चांगल्या कॅमेऱ्याचे लक्षण मानले जाते. मात्र अधिक मेगापिक्सेल असलेले फोन महाग आहेत आणि प्रत्येकाच्या बजेटमध्ये बसत नाहीत. त्यामुळे आज 108 MP कॅमेरा असलेल्या स्मार्टफोन बद्दल जाणून घेऊयात, ज्यांची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा कमी आहे.
मोटोरोला एज फ्यूजन (Motorola Edge Fusion)
Motorola Edge Fusion फोनमध्ये 6.7 इंचाचा फुल एचडी + प्लस डिस्प्ले देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन अँड्रॉइड 11 बेस्ड MyUX ऑपरेटिंग सिस्टमवर काम करेल. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल आहे. याशिवाय 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 एमपी कॅमेरा आहे. हा स्मार्टफोन 5000 mAh बॅटरी सपोर्टसह येतो. या फोनची किंमत 21,499 रुपये आहे. मात्र डिस्काउंट नंतर ती हा फोन 20 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करता येणार आहे.
Mi 10i
Mi 10i या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले आहे. या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 750G प्रोसेसर सपोर्ट देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वाड कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये पहिला 108 मेगापिक्सल सॅमसंग HM2 सेन्सर, दुसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, तिसरा 2MP मॅक्रो लेन्स आणि चौथा 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या समोर 16 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनची किंमत 20,999 रुपये आहे. पण डिस्काऊंटमध्ये हा फोन 20 हजार रुपयांच्या कमी किमतीत मिळू शकतो.
रेड मी नोट 10 प्रो मॅक्स (Redmi Note 10 Pro Max)
Redmi Note 10 Pro Max फोनमध्ये 6.6 इंच सुपर AMOLED FHD + डिस्प्ले आहे. फोन Qualcomm Snapdragon 732G प्रोसेसरवर सादर करण्यात आला आहे. फोन अँड्रॉइड 11 बेस्ड MIUI 12 ला सपोर्ट करेल. फोनच्या मागील बाजूस क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108 मेगापिक्सल थर्ड जनरेशन ISOCELL HM2 आहे. 8 एमपी अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 5 एमपी सुपर मायक्रो लेन्स आणि 2 एमपी डेप्थ सेन्सर सपोर्ट करेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 20 एमपीचा लेन्स देण्यात आला आहे. फोनमध्ये 5020mAh ची बॅटरी आहे, जी 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येईल. या फोनची किंमत 18,999 रुपये आहे.
रीअलमी 8 प्रो (Realme 8 Pro)
Realme 8 Pro या स्मार्टफोनमध्ये 4 इंच सुपर AMOLED OLED डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 108MP सॅमसंग ISOCELL HM2 आहे. याशिवाय 8 एमपी 119 डिग्री अल्ट्रा वाइड अँगल लेन्स, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी बी अँड डब्ल्यू पोर्ट्रेट लेन्स सपोर्ट दिला आहे. फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 720G ला सपोर्ट करण्यात आला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे.
मोटो जी 60 (Moto g 60)
Moto g 60 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच FHD+ डिस्प्ले आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. यात पहिला 108MP प्राथमिक सेन्सर, दुसरा 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि तिसरा 2MP डेप्थ सेन्सर आहे. फोनच्या समोर सेल्फीसाठी 32 एमपी कॅमेरा देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी आहे, जी 20W फास्ट चार्जिंग आणि क्वालकॉम क्विक चार्ज 4.0 ला सपोर्ट करते. यामध्ये स्नॅपड्रॅगन 732 जी प्रोसेसरला सपोर्ट करण्यात आला आहे. या फोनची किंमत 17,999 रुपये आहे.