एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयफोन X ची किंमत भारतात 1 लाखांपेक्षाही जास्त असणार?
भारतातही अॅपलचा हा सर्वात महागडा फोन ठरणार आहे. या फोनची भारतीय बाजारातील किंमत 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.
मुंबई : अॅपल आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X हे तीन फोन अमेरिकेत लाँच केले जाणार आहेत. याच अॅपल इव्हेंटमध्ये अॅपल टीव्ही आणि अॅपल वॉच 3 लाँच होण्याची शक्यता आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 10.30 वाजता हा इव्हेंट सुरु होईल.
आयफोन X हा कंपनीचा या वर्षातला सर्वात महत्त्वाचा फोन असेल. अॅपलला यावर्षी पहिला फोन लाँच करुन दहा वर्षे पूर्ण होत आहेत. हा कंपनीचा सर्वात आकर्षक आणि महागडा फोन असण्याची शक्यता आहे. 20 सप्टेंबरपासून हा फोन अमेरिकेतील बाजारात उपलब्ध होईल.
भारतीय बाजारात फोन कधीपर्यंत येणार, किंमत काय असणार?
भारतात आयफोन X कधीपर्यंत येईल, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र दिवाळीपर्यंत नवा आयफोन भारतात येणं अपेक्षित आहे. आयफोन X चे तीन व्हेरिएंट असतील असंही बोललं जात आहे. या फोनच्या 64GB व्हेरिएंटची किंमत 999 डॉलर, 256GB व्हेरिएंटची किंमत 1099 डॉलर असेल आणि या फोनचं सर्वात महागडं व्हेरिएंट 512GB असेल, ज्याची किंमत 1199 डॉलर असेल, असं बोललं जात आहे.
भारतातही अॅपलचा हा सर्वात महागडा फोन ठरणार आहे. या फोनची भारतीय बाजारातील किंमत 1 लाख रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त असण्याची शक्यता आहे.
आयफोन 8 आणि आयफोन 8 प्लसचे फीचर्स
आयफोन 8 मध्ये 4.7 इंच आकाराची, तर आयफोन 8 प्लसमध्ये 5.5 इंच आकाराची स्क्रीन असेल. या फोनला वायरलेस चार्जिंग आणि आयफोन 8 प्लस साठी ड्युअल रिअर कॅमेरा ही फीचर्स असण्याची शक्यता आहे. मात्र या फोनच्या सर्व फीचर्सबाबतचा सस्पेंस अजूनही कायम आहे.
अॅपल वॉच 3
या आयफोन इव्हेंटमध्ये आयफोन 8, आयफोन 8 प्लस आणि आयफोन X या फोनसोबत एलटीई सपोर्टसह अॅपल वॉच 3 देखील लाँच होणार आहे.
अॅपल 4K टीव्ही
4K रिझोल्युशनसह अॅपल टीव्हीही या इव्हेंटमध्ये लाँच केली जाण्याची शक्यता आहे. ब्लुमबर्गच्या वृत्तानुसार या अॅपल टीव्हीमध्ये 4K रिझोल्युशनसह लाईव्ह स्ट्रिमिंग फीचर असेल.
अॅपल iOS 11, MacOS High Sierra, अॅपल वॉच OS 4
आयफोन, मॅकबुक आणि वॉचेससाठी आयओएसची नवी अपडेट या इव्हेंटमध्ये रिलीज केली जाण्याची शक्यता आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक फीचर्सचा समावेश करण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
शेत-शिवार
मुंबई
निवडणूक
Advertisement