एक्स्प्लोर
Advertisement
12 सप्टेंबरला आयफोन 7 लाँच होणार?
नवी दिल्ली: टेक्नॉलॉजी क्षेत्रातील लोकप्रिय कंपनी अॅपल आपला नवा आयफोन 12 सप्टेंबरपर्यंत लाँच करण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीही अॅपलने आयफोन 6 आणि आयफोन 6S सप्टेंबरमध्येच लाँच केले होते. त्यावेळी 9 सप्टेंबर रोजी लाँच करून 12 सप्टेंबरपासून प्री ऑर्डर डिस्ट्रीब्यूट करण्यास सुरु केली होती. त्यानंतर 25 सप्टेंबरपासून या आयफोनची विक्री सर्वत्र सुरु झाली होती.
या वर्षी आयफोन 7 आणि आयफोन 7S सर्वत्र लाँच होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर आयफोन प्रोचे लाँचिंगदेखील लवकरच होण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार, नव्या आयफोनमध्ये जास्त सुधारणा करण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये 3.5mm हेडफोन जॅक नसेल. मात्र, फोनमध्ये फोर्स टच होम बटन आणि नवी अॅन्टिना लाईन्ससारख्या नव्या सुविधा उपलब्ध असतील. यासोबतच या फोनमध्ये A10 चिप आणि 32 GB, 128GB आणि 256GB सहित बाजार उतरवू शकतो.
आयफोन 7 मध्ये 12 मेगापिक्सल ड्यूअल कॅमेराचे उत्तम फिचर देण्यात आले आहे. तसेच याफोनला 3GB रॅमही असणार आहे. तसेच आयफोन 7 आणि आयफोन 7S या दोन्ही स्मार्टफोनमध्ये मोठे कॅमेरे असण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.
या स्मार्टफोनमध्ये डार्क स्पेस ब्लॅक ऑप्शनही असण्याची शक्यता आहे. अॅपल सप्टेंबरमध्ये होणाऱ्या या लाँचिंग सोहळ्याची ऑगस्टमध्ये घोषणा करण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
भारत
क्रीडा
Advertisement