एक्स्प्लोर
iPhone 11 च्या लाँचिंगची तारीख ठरली, 'ही' असतील खास वैशिष्ट्ये
10 सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमध्ये तीन नवीन आयफोन्ससोबतच अॅपल वॉचचं देखील नवीन मॉडेल लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
अॅपलचा iPhone 11 हा मोबाईल फोन 10 सप्टेंबरला लाँच होणार आहेत. 10 तारखेला अमेरिकेत होणाऱ्यां कंपनीच्या वार्षिक इव्हेंटमध्ये अॅपलच्या iPhone 11 या फोनसोबत इतर प्रॉडक्टसचेही नवीन मॉडेल्स लाँच करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या मोबाईलच्या लाँचिंगपूर्वीच सध्या ऑनलाइन विश्वात फोनच्या फिचर्स आणि किंमतीबद्दल अनेक अंदाज लावले जात असल्याचं पाहायला मिळत आहे.
iPhone 11 च्या डिजाईनमध्ये मोठा बदल केला जाणार असल्याचं बोललं जात आहे. या फोनच्या मागच्या बाजूला तीन कॅमेरा देण्यात येणार असल्याची सध्या चर्चा आहे. फोनच्या मॉडेलची काही छायाचित्रे देखील इंटरनेटवर लीक झाली आहेत. त्यावरुन या फोनच्या मागच्या बाजूला स्क्वेअर सेटअपमध्ये तीन कॅमेरे देण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. अॅपलच्या पारंपारिक डिजाईनपेक्षा हे डिजाईन अतिशय वेगळं आहे मात्र कंपनीकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
आयफोन 11 सोबतच आयफोन 11 प्रो आणि आयफोन 11 मॅक्स अशी आणखी दोन मॉडेल्स लाँच केली जाण्याची शक्यता आहे. यापैकी आयफोन 11 मध्ये मागच्या बाजूला ड्यूअल कॅमेरा सेटअप असेल तर इतर दोन मॉडेल्समध्ये ट्रिपल कॅमेरा असेल, असा अंदाज आहे.
या मोबाईल फोन्सच्या स्पेसीफिकेशन्सबाबत अनेक वेबसाईट्सकडून अंदाज लावले जात आहेत. त्यानूसार iPhone 11 मध्ये 6.1 इंचाचा डिस्प्ले असणार आहे. तसेच यामध्ये ए13 चिपसेट आणि 4 जीबी रॅम असणार आहे. हा फोन 64 जीबी, 256 जीबी, 512 जीबी क्षमता असलेल्या तीन वेगळ्या प्रकारात उपलब्ध होऊ शकतो. तसेच यामध्ये 12 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल क्षमतेचा ड्युअल रिअर कॅमेरा असू शकतो. या फोनची किंमत 54 हजार रुपयांपासून पुढे असू शकते.
iPhone 11 Pro मध्ये 5.8 इंचाचा स्क्रीन असू शकतो. तसेच यामध्ये ए13 चिपसेटसह 6 जीबी रॅम असेल असा अंदाज आहे. हा फोन 128 जीबी, 256 जीबी आणि 512 जीबी क्षमतेमध्ये मिळू शकतो. यामध्ये 12 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल क्षमतेचा ट्रिपल रिअर कॅमेरा असणार आहे. या फोनमध्ये वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात येण्याचीही शक्यता आहे. या फोनची किंमत 72 हजार रुपयांपासून पुढे असू शकते.
iPhone 11 Max मध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी डिस्प्ले देण्यात येऊ शकतो. या फोनमध्येदेखील ए13 चिपसेट आणि 6 जीबी रॅम असेल. तसेच आयफोन 11 प्रो प्रमाणे हे मॉडेल देखील 128 जीबी, 256 जीबी, 512 जीबी क्षमतेमध्ये उपलब्ध होऊ शकते. या फोनमध्ये 12 मेगापिक्सल क्षमतेचा फ्रंट कॅमेरा आणि 12 मेगापिक्सल क्षमतेचा ट्रिपल रिअर कॅमेरा मिळेल. या फोनची किंमत 80 हजार रुपयांपासून पुढे असू शकते.
या तीन नवीन आयफोन्ससोबतच 10 सप्टेंबरला होणाऱ्या इव्हेंटमध्ये अॅपल वॉचचं देखील नवीन मॉडेल लाँच करण्यात येण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement