एक्स्प्लोर
'अॅपल'चे सीईओ टिम कूक सिद्धिविनायकाच्या दर्शनाला
मुंबई: मोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी अॅपलचे सीईओ टिम कूक यांच्या भारत दौऱ्याला आज मुंबईतून सुरुवात झाली. कूक यांनी या दौऱ्याचा श्रीगणेशा दादरच्या सिद्धिविनायक मंदिराला भेट देऊन केला.
या भेटीदरम्यान कूक यांच्यासोबत अॅपल इंडियाचे प्रमुखही उपस्थित होते. यावेळी मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीशीही कूक यांची बातचीत झाली. आज दिवसभरात टिम कूक टाटा ग्रुपचे चेअरमन सायरस मिस्त्री यांची भेट घेणार आहेत.
कूक यांच्या पुढच्या दौऱ्याबद्दल अजून स्पष्टता नसली तरीही मुंबईनंतर कूक -हैद्राबाद, बंगळुरु, आणि दिल्लीलाही भेट देणार असल्याची शक्यता आहे. नवी दिल्लीतील भेटीदरम्यान टीम कूक पंतप्रधान मोदींचीही भेट घेण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement