एक्स्प्लोर
भारतात flipcart ला मागे टाकून Amazon नंबर वन
नवी दिल्ली: ऑनलाईन शॉपिंगची अमेरिकन कंपनी अमेझॉनने भारतात अव्वल स्थानी धडक मारली आहे. फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला मागे टाकत अमेझॉनने पहिला क्रमांकावर मिळवला. ई-कॉमर्स क्षेत्रातील चालू वर्षांच्या तीन महिन्यातील ही आकडेवारी आहे.
ही यादी भारतीय अॅपचे मुल्यांकन करणाऱ्या लीडिंग डाटा कंपनी अॅप एनने प्रकाशित केली आहे. एक अन्य वेबसाईट कोमस्कोरने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या शेवटी अमेझॉनने फ्लिपकार्टला पछाडले होते. तर आणखीन एका रिपोर्टनुसार, मोबाईल आणि कॉम्प्य़ूटरवरील ट्रॉफिकींगनुसार, अमेझॉनचा जगभरातील 300 वेबसाईटमध्ये 128 क्रमांक होता. तर फ्लिपकार्टचा क्रमांक 223 वा आहे. या वेबसाईटच्या स्कोर कॉलक्यूलेशन क्वॉलिटी आणि क्वांटिटीच्या आधारावर येणाऱ्या यूनिक व्हीजिटर्स, वेबसाईट पेज व्ह्यूवर्स आदीच्या माध्यमातून हा क्रम निश्चित करण्यात आहे.
अमेझॉनने आपल्या अॅपचे डाऊनलोड अधिकाधिक यूजर्सनी करण्यासाठी जाहिरात खर्चाचे विवरण प्रकाशित केले आहे. तर फ्लिपकार्टने आपल्या जाहिरातीवरील खर्चात मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. विशेष म्हणजे, अमेझॉनच्या अॅपची क्वालिटीला ग्लोबल टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement