एक्स्प्लोर
सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी, 'ट्राय'ची नवी वेबसाईट
यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने नवी वेबसाईट लाँच केली आहे. सोमवारी ही माहिती देण्यात आली.
![सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी, 'ट्राय'ची नवी वेबसाईट all tariff plans at one place trai launched new website सर्व कंपन्यांचे प्लॅन एकाच ठिकाणी, 'ट्राय'ची नवी वेबसाईट](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2018/04/17130725/TRAI.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : ग्राहकांना सर्व दूरसंचार कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनची माहिती आता एकाच ठिकाणी मिळणार आहे. यासाठी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण अर्थात ‘ट्राय’ने नवी वेबसाईट लाँच केली आहे. सोमवारी ही माहिती देण्यात आली.
‘ट्राय’ची नवी वेबसाईट (http://tariff.trai.gov.in) वर वेगवेगळ्या टॅरिफ प्लॅन्सची माहिती डाऊनलोड करता येईल अशा फॉरमॅटमध्ये ती माहिती उपलब्ध आहे. यामुळे ग्राहकांना सर्व कंपन्यांच्या टॅरिफ प्लॅनशी तुलना करुन योग्य तो प्लॅन निवडता येईल, असं ‘ट्राय’ने म्हटलं आहे.
या वेबसाईटवर ग्राहकांना फिडबॅकही देता येईल. ग्राहक मोबाईल, लँडलाईन, प्रीपेड, पोस्टपेड आणि सर्कलनुसार ऑपरेटर्स निवडून आपला प्लॅन निवडू शकतात. दरम्यान, सध्या तरी या पोर्टलवर फक्त दिल्ली सर्कल दिसत आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
राजकारण
महाराष्ट्र
क्रिकेट
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)