एक्स्प्लोर
399 रुपयात 84 जीबी डेटा, एअरटेलचा नवा प्लॅन
रिलायन्स जिओला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं नवा प्लॅन आणली आहे
मुंबई : देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी एअरटेलनं जिओला टक्कर देण्यासाठी नवा प्लॅन लाँच केला आहे. 4जी यूजर्ससाठी एअरटेलनं 399 रुपयात 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग असा नवा प्लॅन आणला आहे.
या नव्या प्लॅनची वैधता 84 दिवसांसाठी असणार आहे. रिलायन्स जिओच्या 'धन धना धन' ऑफरला टक्कर देण्यासाठी एअरटेलनं हा नवा प्लॅन लाँच केला आहे. याआधी जिओनं मागील महिन्यात 'धन धना धन' ऑफरमध्ये बदल करत 399 रुपयात 84 जीबी डेटा असा नवा प्लॅन आणला होता.
दरम्यान, एअरटेलनं याआधी 293 रुपये आणि 499 रुपये असे दोन नवे प्लॅनही लाँच केले होते.
रिलायन्स जिओ टेलिकॉम क्षेत्रात आल्यापासून अनेक टेलिकॉम कपंन्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. दुसरीकडे आता जिओनं 399 रुपयांच्या रिचार्जवर कॅशबॅक ऑफरही आणली आहे.
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही, याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)
संबंधित बातम्या :
दररोज अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंग, व्होडाफोनची ऑफर
रिलायन्स जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर
70 रुपयात वर्षभर अनलिमिटेड डेटा, रिलायन्स कम्युनिकेशनचा नवा प्लॅन!
168 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग, एअरसेलचा नवा प्लॅन
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement