एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
लवकरच एअरटेल पेमेंट बँक, मोबाईल नंबरच अकाऊंट नंबर
मुंबई : ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसमध्ये सध्या 'पेटीएम'चा दबदबा आहे. पेटीएममध्ये अलिबाबा या चिनी कंपनीचा सर्वाधिक वाटा आहे. मात्र, पेटीएमला आता एक भारतीय कंपनी आव्हान देणार आहे. भारती एअरटेल आता ऑनलाईन पेमेंट सर्व्हिसमध्ये उतरणार आहे.
आरबीआयकडून एअरटेल पेमेंट बँकेला परवानगी
प्रसिद्ध भारतीय टेलिकॉम कंपनी 'भारती एअरटेल' आता ऑनलाईन मार्केटप्लेस लॉन्च करणार आहे. विशेष म्हणजे ही पहिलीच पूर्णपणे भारतीय पेमेंट बँक असेल. एअरटेल पेमेंट्स बँक असे नाव असेल. 11 एप्रिल 2016 रोजीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एअरटेला पेमेंट्स बँकेसाठी परवाना दिला आहे.
राजस्थानमध्ये पायलट प्रोजेक्ट सुरु
पायलट प्रोजेक्टसाठी एअरटेलने राजस्थान राज्याची निवड केली आहे. टेस्टिंगनंतर संपूर्ण देशभर ऑनलाईन पेमेंट सर्व्हिस सुरु केली जाणार आहे. त्यामुळे पेटीएमसारख्या आधीच या क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केलेल्या कंपन्याना स्पर्धा निर्माण होणार आहे.
नोटाबंदीनंतर एअरटेलच्या हालचाली वाढल्या!
500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर देशातील अनेकांचे दैनंदिन व्यवहार कोलमडले. मात्र, या काळातही अनेकजण व्यवहार करताना दिसतायेत. या व्यवहारांसाठी पेटीएमचा वापर केला जात आहे. पेटीएमने 9 नोव्हेंबरपासून कमाईचे रेकॉर्ड तोडले आहेत. हे पाहता एअरटेलने ऑनलाईन मार्केटप्लेससाठी हालचाली वाढवल्या आहेत.
डिजिटल पेमेंट सेवेला चालना देण्याचा प्रयत्न
राजस्थानमध्ये सध्या एअरटेलची एकूण 10 हजार रिटेल आऊटलेट्स आहेत. या ठिकाणी अकाऊंट ओपन करता येणार आहे. वेगवेगळ्या योजना, सोयीची बँकिंग सर्व्हिस इत्यादी ग्राहकांना फायदेशीर ठरतील, अशा सुविधा एअरटेलकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यंदा वर्षअखेरपर्यंत एक लाख रिटेल आऊटलेट्स एअरटेल सुरु करणार आहे. डिजिटल पेमेंट इकोसिस्टमला चालना देण्यासाठी एअरटेलने हे पाऊल उचलले आहे.
एअरटेल पेमेंट बँकेचे एमडी आणि सीईओ काय म्हणाले?
"बँकिंग क्षेत्रात एअरटेल पेमेंट्स बँक नक्कीच महत्त्वाची भूमिका बजावेल. राजस्थानमध्ये सुरु झालेल्या पायलट प्रोजेक्टच्या रुपाने एअरटेलने या क्षेत्रात मोठं पाऊल टाकलं आहे. लवकरच संपूर्ण भारतभर या सेवेची सुरुवात केली जाईल", अशी माहिती एअरटेल पेमेंट्स बँकचे एमडी आणि सीईओ शशी अरोरा यांनी दिली.
एअरटेल पेमेंट्स बँकेचे महत्त्वाचे मुद्दे -
- अकाऊंट ओपन करण्यासाठी फक्त आधार कार्ड नंबरची गरज
- ग्राहकांचा एअरटेल नंबरच पेमेंट्स बँकेचा अकाऊंट नंबर असेल.
- सेव्हिंग अकाऊंटवर वर्षाला 7.25 टक्के व्याज
- कोणत्याही बँकेत पैसे ट्रान्सफर करता येणार
- प्रत्येक सेव्हिंग अकाऊंटवर एक लाखापर्यंत पर्सनल अँक्सि़डेंटल इन्श्युरन्स
- देशभरातून कुठूनही पैसै जमा किंवा काढता येणार
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement