एक्स्प्लोर
84 जीबी 4G डेटा, Airtelच्या दोन नव्या ऑफर
जिओच्या नवनवीन ऑफरनं टेलिकॉम क्षेत्रातील कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. पण अशावेळी जिओला टक्कर देण्यासाठी इतर कंपन्याही नवीन ऑफर लाँच करत आहेत. एअरटेलनंही अशीच एक नवी ऑफर आपल्या यूजर्ससाठी आणली आहे.
मुंबई: रिलायन्स जिओच्या नव्या टेरिफ प्लानला टक्कर देण्यासाठी देशातील मोठी टेलीकॉम कंपनी एअरटेलनं कंबर कसली आहे. एअरटेलनं आपले दोन नवे प्लॅन आणले आहेत. एका प्लॅनमध्ये 293 रुपयात यूजर्सला 84 जीबी डेटा मिळणार आहे. तर 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे.
दोन्ही प्लॅन वेगवेगळे असले तरी यामध्ये डेटा सारखाच मिळणार आहे. पण याच्या कॉलिंगमध्ये फरक असणार आहे. 293 रुपयांच्या प्लॅनमध्ये यूजर्सला 84 जीबी डेटा 84 दिवसांसाठी मिळणार आहे. पण यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग फक्त एअरटेल टू एअरटेल असणार आहे. तर 449 रुपयांच्या प्लॅनमध्ये 84 जीबी डेटासह सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग 84 दिवसांपर्यंत मिळणार आहे.
जिओ 399 प्लॅन
जिओनं आपली नवी 'धन धना धन' ऑफर लाँच केली असून या महिन्यानंतर धन धना धन ऑफर संपल्यानंतर ही ऑफर सुरु ठेवण्यासाठी यूजर्सला 399 रुपयांचं रिचार्ज करावं लागेल. 399 रुपयांच्या प्लानमध्ये यूजर्सला तीन महिन्यांसाठी अनलिमिटेड कॉलिंग आणि 84 जीबी डेटा मिळणार आहे.
(नोट : संबंधित ऑफरनुसार रिचार्ज करण्यापूर्वी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे किंवा नाही याची कंपनीच्या वेबसाईट किंवा अॅपवरुन खात्री करा)
संंबंधित बातम्या:
रिलायन्स जिओची नवी धन धना धन ऑफर!
ideaची नवी ऑफर, तब्बल 84 जीबी डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement