एक्स्प्लोर
एअरसेलचं अनलिमिटेड कॉलिंग फीचर लाँच
मुंबई: एअरटेल, वोडाफोन आणि आयडियानंतर आता एअरसेलनंही अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग सेवा सुरु केली आहे. आपल्या प्रीपेड यूजर्ससाठी ही सेवा एअरसेलनं सुरु केली आहे. कंपनीनं RC 14 आणि RC 249 हे दोन प्लान सध्या आणले आहेत. हे प्लान घेतल्यास यूजर्स एअरसेल आणि सर्व नेटवर्कवर फ्री अनलिमिटेड कॉलिंग करु शकता. हा प्लान 28 दिवसांपर्यंत लागू असेल.
RC 249 प्लानमध्ये ग्राहक 249 रुपयाचं टेरिफ प्लान घ्यावा लागणार आहे. यानंतर यूजर्स कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉल आणि 2जी डेटा मिळणार आहे. तर RC 14 मध्येही समान फीचर असणार आहे. पण हा प्लान फक्त एक दिवसासाठी वैध असणार आहे.
इतर टेलिकॉम कंपन्यांकडूनही नव्या ऑफर
वोडाफोनची 'डबल डेटा' ऑफर
टेलिकॉम कंपनी वोडाफोननं काही दिवसापूर्वीच एका नव्या ऑफरची घोषणा केली होती. 4जी प्रीपेड यूजर्स उपलब्ध पॅकवर ‘डबल डेटा’ म्हणजेच दुप्पट डेटासोबत मोबाइल इंटरनेटचा लाभ घेऊ शकतात. ही ऑफर 255 रुपयांपासून सुरु होणाऱ्या सर्व 4जी मार्केट पॅकवर उपलब्ध आहे.
या ऑफरुनुसार, वोडाफोन 4जी प्रीपेड यूजर्स 999 रुपयांचं पॅक खरेदी केल्यास 20 जीबी डेटा मिळणार आहे. तसंच 50 रुपयात एक जीबी डेटा मिळवू शकतात.
एयरटेलचे दोन नवे प्लॅन
भारती एयरटेलनेही दोन नवे प्लॅन लॉन्च केले आहेत. या नव्या प्लॅननुसार 4G डेटासोबत अनलिमिटेड लोकल-एसटीडी कॉल मिळणार आहेत. यामध्ये 145 रुपयांच्या प्लॅनचा समावेश आहे.
एयरटेलच्या 145 रुपयांच्या प्लॅनमध्ये 300 एमबी 4G डेटासोबत एयरटेल ते एयरटेल मोफत लोकल-एसटीडी कॉलची सुविधा मिळेल. 345 रुपयांच्या प्लॅनमध्ये देशात कुठल्याही नेटवर्कवर मोफत लोकल-एसटीडी कॉलसोबत 1 जीबी 4G डेटा मिळेल. दोन्ही प्लॅनची व्हॅलिडिटी 28 दिवस असेल आणि देशभरातील एयरटेलच्या ग्रहाकांसाठी हे प्लॅन उपलब्ध असेल.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement