WhatsApp, Amazon पाठोपाठ Airtelच्या पेमेंट सर्विसला सुरुवात; असा करा वापर
व्हॉट्सअॅप, अॅमेझॉननंतर आता टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही पेमेंट सर्विसच्या जगात पाऊल टाकलं आहे. कंपनीने Airtel Safe Pay नावाची सर्विस सुरु केली आहे.
![WhatsApp, Amazon पाठोपाठ Airtelच्या पेमेंट सर्विसला सुरुवात; असा करा वापर After whatsapp amazon airtel has now started payment service know how to use WhatsApp, Amazon पाठोपाठ Airtelच्या पेमेंट सर्विसला सुरुवात; असा करा वापर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2021/01/21153453/Airtel.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : देशात गेल्या काही दिवसांपासून डिजिटल आणि UPI पेमेंटचा वापर वेगाने वाढत आहे. हिच बाब लक्षात घेत अनेक कंपन्यांनी पेमेंच सर्विस सुरु केल्या आहेत. यामध्ये व्हॉट्सअॅप, अॅमेझॉन यांचाही समावेश आहे. अशातच आता टेलिकॉम कंपनी एअरटेलनेही पेमेंट सर्विसच्या जगात पाऊल ठेवलं आहे. कंपनीने Airtel Safe Pay नावाची सर्विस सुरु केली आहे. ही सर्विस एअरटेलच्या ऑनलाईन बँकिंग सिस्टम Airtel Payments Bank च्या अंतर्गत सुरु करण्यात आली आहे. कंपनीच्या वतीनं दावा करण्यात आला आहे की, यामार्फत युजर्सना सेफ ट्रान्झॅक्शन करता येईल.
सुरक्षिततेची घेण्यात आली काळजी
एअरटेलच्या वतीने हे स्पष्ट करण्यात आलं आहे की, Airtel Safe Pay मध्ये युजर्सच्या सुरक्षेची काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये युजर्स सुरक्षित पद्धतीने पैसे ट्रान्सफर करु शकणार आहेत. हे टू फॅक्टर ऑथेंटिकेशन सिस्टमहून उत्तम असल्याचं सांगण्यात येत आहे.
ऑनलाईन फ्रॉडपासून वाचणं हेच उद्दिष्ट
Airtel ने दिलेल्या माहितीनुसार, या सर्विसची सुरुवात युजर्सला ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवण्याच्या हेतून करण्यात आली आहे. यामार्फत युजर्स कोणत्याही फसवणुकीशिवाय ट्रान्झॅक्शन करु शकतील. कंपनीच्या वतीनं दावा केला जात आहे की, ही सेफ पेमेंट सर्विस आहे. त्याचसोबत ही फार सोपी प्रक्रिया आहे.
असं वापरा Airtel Safe Pay
- Airtel Safe Pay ला Airtel Payments Bank मध्ये जाऊन सुरु करता येणार आहे.
- त्यासाठी सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये Airtel Thanks अॅप ओपन करा.
- आता स्क्रिनवर खाली Payments Bank ऑप्शन दिसेल, तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे.
- एवढं केल्यानंतर तुमच्याद्वारे अॅर करण्यात आलेलं अकाउंट सेफ पे स्टेट डिअॅक्टिवेटेड दिसून येईल.
- तुम्ही जसं अकाउंटवर क्लिक कराल, तुम्हाला इनेबल सेफ पेचा ऑप्शन दिसून येईल.
- हे इनेबल केल्यानंतर नेट बँकिंग आणि यूपीआय पेमेंट्स करण्यात येईल.
- त्यानंतर प्रत्येक वेळी ट्रान्झॅक्शन केल्यानंतर अलर्ट मेसेज मिळेल आणि तुमच्या सहमतीनंतरच ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
Google Pay ला मागे टाकत PhonePe नंबर वन UPI अॅप, डिसेंबर महिन्यात सर्वाधिक व्यवहार
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)