सूर्याची 10 वर्षे! अमेरिकेच्या NASA चा ´हा´ व्हिडिओ ट्रेंडमध्ये
अमेरिकेच्या नासाने एक व्हिडीओ प्रसारित केला असून सध्या हा व्हिडीओ ट्रेंडमध्ये आहे. A Decade of Sun या नावाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
न्यूयोर्क : अमेरिकेतील नासा या अंतराळ संशोधन केंद्राने एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या व्हायरल व्हिडिओत नासाच्या सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरीने तब्बल 10 वर्षे सूर्यावर नजर ठेऊन याचे चित्रीकरण केले आहे. या कालावधीत ऑब्जर्वेटरीने अनेक महत्त्वपूर्ण निरीक्षणे टिपली आहेत.
नासाने हा व्हिडीओ प्रसारीत केल्यानंतर काही कालावधीतचं युट्युबवर ट्रेंडमध्ये आला आहे. कारण, किमान 10 वर्षे अभ्यास करुन सूर्याचा हा खास व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे. स्पेस एजन्सी असलेल्या नासा संस्थेने टाकलेला हा व्हिडिओ दोनचं दिवसात किमान आठ लाख लोकांनी पाहिला आहे. सोलर डायनेमिक्स ऑब्जर्वेटरी (एसडीओ) याचा हा व्हिडिओ आहे. 10 वर्षांमध्ये संस्थेने किमान 45 कोटी फोटो काढलेले आहेत. ए डिकेड ऑफ सन’ A Decade of Sun या नावाने हा व्हिडिओ प्रसारित करण्यात आला आहे.
सूर्यग्रहणादरम्यान दिव्यांग मुलांना जमिनीत पुरुन ठेवल्याचा धक्कादायक प्रकार काय आहे व्हिडीओत?
नासा या अंतराळ संशोधन केंद्राने सलग दहा वर्षे सुर्याचे निरक्षण केलं आहे. सलग दहा वर्षे सुर्यावर होणारे बदल, घटनांचे त्यांनी चित्रिकरण केलं आहे. या चित्रिकरणादरम्यान महत्वाची माहिती मिळाली असल्याचे नासाने सांगितले आहे. या दहा वर्षात सूर्याची 45 कोटी हाय क्वालिटी रिजोल्यूशनची छायाचित्र काढली आहेत. या फोटोंचा दोन कोटी गीगाबाइट डेटा जमा करण्यात आला. या 61 मिनिटांच्या व्हिडीओमध्ये सर्याची दहा वर्षे दाखवण्यात आली आहेत. या व्हिडीओमध्ये सुर्याची प्रत्येक तासामधील एक फोटो घेण्यात आला आहे. यात एक सेकंदामध्ये एक दिवस दाखवण्यात आला आहे. ही सर्व छायाचित्र दोन जून 2010 ते एक जून 2020 पर्यंतची आहेत.