(Source: ECI/ABP News/ABP Majha)
5G Service : Airtel की Jio? कोणतं नेटवर्क सर्वात स्वस्त? काय असेल फरक?
Airtel vs Jio 5G Network : एअरटेल 5G आणि जिओ 5G यांच्यात नेटवर्कमध्ये काय फरक असेल. कोणाचं नेटवर्क स्वस्त असेल? येथे जाणून घ्या.
5G Internet : भारतात नुकतीच 5G इंटरनेट सेवा (5G Service) सुरु करण्यात आली आहे. या हायस्पीड 5G इंटरनेटमुळे (5G Internet) येत्या काळात अमुलाग्र बदल होणार आहेत. 5G इंटरनेटमुळे आता शिक्षण, आरोग्य, कृषी आणि बँकिंगसह अनेक क्षेत्रांमध्ये महत्त्वाचे बदल घडून येतील. याचा परिणा भारताच्या अर्थव्यवस्थेवर होणार आहे. भारताआधी अमेरिका, दक्षिण कोरिया, ब्रिटन, जपान, चीन आणि युरोपमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली आहे.
5G इंटरनेट सेवा 4G पेक्षा दहापट वेगवान इंटरनेट स्पीड देईल. दिवाळीपर्यंत ग्राहकांना 5G इंटरनेट सर्विस वापरता येईल. रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्या सर्वात आधी 5G इंटरनेट सेवा पुरवणार आहेत. सुरुवातील 13 शहरांमध्ये सुरु होणारं हे 5G इंटरनेटचं जाळं पुढील वर्षापर्यंत देशभरात पसरेल. जिओने सर्वात स्वस्त 5G इंटरनेट देण्याचा दावा केलाय. त्यामुळे आता यांच्या किमती काय असतील, हे येत्या काळात समोर येईल.
भारतीय टेलिकॉम ग्राहकांना येत्या काही महिन्यांत 5G सेवा मिळेल. भारतातील 5G सेवा पहिल्या टप्प्यात केवळ निवडक शहरांमध्ये आणली गेली आहे. ही सेवा पुढील काही वर्षांमध्ये संपूर्ण देशात पसरेल. रिलायन्स जिओचे मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे की, जिओ सर्वात स्वस्त 5G सेवा देईल. 2023 पर्यंत ग्रामीण भागासह संपूर्ण देशभरात जिओ 5G सेवा सुरु करण्यात येईल.
5G सिमकार्डबाबत ग्राहकांच्या मनात अनेक संभ्रम आहेत. एअरटेल कंपनीनं सांगितलंय की, सध्याचे सिम 5G मोबाईलवर काम करेल. कारण तुमच्या सध्याच्या एअरटेल 5G नेटवर्कमध्ये अपग्रेड होण्याचा पर्याय आधीचं देण्यात आला आहे. त्यामुळे तुमच्या जुन्या सिमकार्डवर 5G इंटरनेट काम करेल. पण 5G वापरण्यासाठी ग्राहकांकडे 5G मोबाईल फोन असणे आवश्यक आहे. फक्त सिमकार्ड 5G असून चालणार नाही. दरम्यान जिओने सिमकार्डबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. सुस्साट... वेगवान अशा 5G नेटवर्कचा पूर्ण फायदा घेण्यासाठी तुमच्याकडे 5G फोनसह 5G सिमकार्ड असणे आवश्यक आहे.
एअरटेलकडून भारतात 5G सेवा सुरू
देशात 5G इंटरनेट सेवा सुरू करणारी एअरटेल (Airtel) ही पहिली कंपनी आहे. एअरटेलने सध्या दिल्ली, मुंबई, वाराणसी आणि बंगळुरूसह आठ शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा सुरू केली आहे. लवकरच संपूण देशामध्ये एअरटेल 5G चं जाळं पसरेल.
रिलायन्स जिओ दिवाळीपर्यंत 5G नेटवर्क आणणार
जिओकडून दिवाळीपर्यंत देशातील निवडक शहरांमध्ये 5G सेवा सुरू करण्यात येणार आहे. जिओ सुरुवातीला दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नई या चार मेट्रो शहरांमध्ये 5G सेवा सुरू करेल. जिओ योजना डिसेंबर 2023 पर्यंत संपूर्ण देशात सेवा सुरु होईल, असे त्याचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.
व्होडाफोन-आयडिया (Vodafone idea)
व्होडाफोन-आयडिया (VI) टेलिकॉम कंपनीने भारतात 5G सेवा सुरू करण्याबाबत अद्याप कोणतीही घोषणा केलेली नाही.
5G ची किंमत
जिओने (Jio) 5G सेवांसाठी किंमत जाहीर केलेली नाही. मात्र जिओने खिशाला परवडणारी आणि स्वस्त 5G सेवा देण्याची घोषणा केली आहे. तर एअरटेलकडून सध्याच्या 4G दरातच 5G सेवा उपलब्ध करुन दिली आहे. येत्या काळात 5G साठी नवीन दराची घोषणानंतर केली जाईल.
200 शहरांमध्ये लवकरच 5G इंटरनेट सुरु होईल
दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी माहिती देत सांगितलं आहे की, सरकार येत्या सहा महिन्यांत 200 शहरांमध्ये 5G इंटरनेट सुरू करण्यासाठी काम करत आहे.