5G Internet Launch Live updates : भारतात आजपासून 5G क्रांती, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते नेटवर्क लाँच; लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
5G Services Launch : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतात 5G इंटरनेट सेवा सुरु होणार आहे.

Background
5G Services To Be Launched on 1 October 2022 : आजपासून भारतात इंटरनेट सेवा सुस्साट होणार आहे. भारतात 1 ऑक्टोबर 2022 पासून 5G इंटरनेट सेवा (5G Internet Services) सुरु झालं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते दिल्लीमध्ये 5G इंटरनेट सेवेचा शुभारंभ पार पडला. यामुळे भारतीयांना मोठा फायदा होणार आहे. एका अहवालात समोर आलं आहे की, 5G मुळे भारतीय अर्थव्यवस्थेला 2023 ते 2040 दरम्यान 36.4 ट्रिलियन रुपये (सुमारे 455 अब्ज डॉलर) फायदा होण्याची शक्यता आहे.
5G लाँच सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मुख्यमंत्र्यांची उपस्थिती
प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते पार पडलेल्या 5G इंटरनेट लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी पनवेल महानगर पालिका विद्यार्थांशी संवाद साधला. पनवेल महापालिका क्षेत्रातील विविध शाळांच्या विद्यार्थ्यांशीही नी संवाद साधला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं 5G चं महत्त्व
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 5G चे फायदे आणि 5G सेवेचा देशामध्ये तंत्रज्ञानातील क्रांतीला कशी मदत होईल, याबद्दल माहिती दिली. परवडणारं तंत्रज्ञान आणि व्यापक नेटवर्कची गरज यासह डिजिटल इंडिया चळवळीला 5G नेटवर्कचा मोठा फायदा होणार आहे.























