एक्स्प्लोर
Advertisement
संपूर्ण भारतात 5G साठी 2021 पर्यंत वाट पाहावी लागणार
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. या संदर्भात रिलायन्सकडून एक महत्वाची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केली आहे. 5 जी टेक्नॉलॉजी भारतातील काही महत्वाच्या भागात 2019-20 पर्यंत उपलब्ध होऊ शकेल तर जिओकडून 2021 पर्यंत सर्वांना परवडेल अशी 5 जी सुविधा भारतातील सर्व शहरात सुरु केली जाईल, असे रिलायन्सचे जिओचे प्रमुख मॅथ्यू ऊम्मन यांनी सांगितले आहे.
मुंबई: भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2 जी, 3 जी आणि आता 4 जीची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5 जी येत आहे. या संदर्भात रिलायन्सकडून एक महत्वाची घोषणा इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये केली आहे. 5 जी टेक्नॉलॉजी भारतातील काही महत्वाच्या भागात 2019-20 पर्यंत उपलब्ध होऊ शकेल तर जिओकडून 2021 पर्यंत सर्वांना परवडेल अशी 5 जी सुविधा भारतातील सर्व शहरात सुरु केली जाईल, असे रिलायन्सचे जिओचे प्रमुख मॅथ्यू ऊम्मन यांनी सांगितले आहे.
भारतात जवळपास 40 कोटी लोक फिचर फोन वापरतात आणि ह्या लोकांपर्यंत पोहोचायचे असेल तर 5 जीचे दर वाढवले जाऊ शकत नाहीत, असेही मॅथ्यू यांनी सांगितले. 5 जी आल्यानंतर प्रत्येक क्षेत्रात अमुलाग्र बदल होणार असून त्यासाठी आवश्यक संसाधनांची निर्मिती आपल्याला पहिल्यांदा करावी लागेल, असेही ते म्हणाले. आपल्याकडे आजही 5 जी वापरासाठीच डिव्हाईस उपलब्ध नाहीत. हे डिव्हाईस 2019 पर्यंत येण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. सामान्यांना परवडेल अशा दरात ही सेवा 2021 पर्यंत संपूर्ण भारतात सुरु होईल असे त्यांनी सांगितले.
आपण उत्पादनावर आधारित अर्थव्यवस्थेत जगत नसून गिगाबाईटवर आधारित अर्थव्यवस्थेत जगतोय, आपण डिजिटल क्षेत्राचा कायापालट करण्याची सुरुवात केली आहे. ज्याची सुरुवात अल्ट्रा ब्रॉडबँडने झाली आहे. आपण डेटा सायन्स, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग अशा क्षेत्रात गुतंवणूक करायला हवी ज्याने कायापालट लवकरात लवकर होईल, असेही त्यांनी नमूद केले.
5जी टेकनोलोजी ही भारतात साधारण 2019-20 पर्यंत उपलद्ध होईल आणि जिओ 2021 पर्यंत सर्वाना परवडेल अशी 5जी सुविधा भारतातील सर्व शहरात सुरु करेल. 2019 मध्ये आर्थिक गणित काय असेल याचा अंदाज लावणे कठीण आहे, कारण 2020-21 च्या शेवटी टेक्नॉलॉजीद्वारे होणारा विकास महत्वाचा असणार आहे. सध्या उपलब्ध मालमत्तांचा फायदा घेऊन क्षमता आणि अनुभव वाढवण्यावर भर दिला गेला पाहिजे हेही ऊम्मन यांनी नमूद केले.
जिओला 5 जीच्या चाचणी साठी 28 गिगाहर्ट्झ स्पेक्ट्रम मिळाले आहेत, असेही त्यांनी सांगितले. स्वीडिश टेलिकॉम गिअर ने बनविलेल्या एरिक्सन कंपनीकडून जिओने चालक विरहित वाहन चालवायचे प्रात्यक्षिक यावेळी दाखविले. आम्ही भारतात केलेल्या अभ्यासावरून 2016 पर्यंत 5 जी द्वारे 27 बिलियन अमेरिकी डॉलर इतका बिझनेस मिळवून देऊ, असे यावेळी मिर्तीलो यांनी यावेळी सांगितले.
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात आधी 2G, 3G आणि आता 4G ची चलती आहे. मात्र, आता याही पुढे जात 5जी येत आहे. स्वीडनमधील एरिक्सन कंपनीने यासाठी पुढाकार घेतला आहे. भारतात एकीकडे सुपरफास्ट स्पीड आणि व्हॉईस-व्हिडीओच्या आकर्षक सुविधा देण्यासाठी 4G चा प्रसार केला जात आहे. रिलायन्स जिओने तर 4 G च्या माध्यमातून टेलिकॉम क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण केली आहे. तर दुसरीकडे 5जी तंत्रज्ञानही भारतात पाऊल टाकण्यासाठी तयार झाले आहे. स्वीडनस्थित एरिक्सन या टेलिकॉम उपकरणं बनवणाऱ्या कंपनीने भारतात 5 G तंत्रज्ञान आणण्यासाठी आयआयटी दिल्लीसोबत हातमिळवणी केली आहे. एरिक्सन कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, "एरिक्सन आणि आयआयटी दिल्लीने भारतात 5 G तंत्रज्ञान आणण्यासाठी करार केला आहे." या करारानुसार एरिक्सन 5 G तंत्रज्ञानासाठी सुरुवातील एक परीक्षण केंद्र स्थापन करणार आहे. त्याचसोबत आयआयटी दिल्लीत एक सेंटरही सुरु केले जाणार आहे, ज्या माध्यमातून देशात 5 G तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. 2020 पर्यंत 5 G तंत्रज्ञान व्यावसायिक वापरासाठी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
राजकारण
निवडणूक
क्रिकेट
Advertisement