5G Connection | भारतात 2021 मध्ये 5G लॉन्च होणार; दूरसंचार कंपनी एरिक्सनचा दावा
संपूर्ण जगभरातील इंटरनेट युजर्सना 5G कनेक्शनबाबत उत्सुकता लागली आहे. अशातच दूरसंचार कंपनी एरिक्सनने एक दावा केला आहे. जगभरात 2026 पर्यंत 3.5 अरब 5जी कनेक्शन असतील, तर भारतात 5जी कनेक्शनची संख्या ही जवळपास 35 कोटी इतकी असेल, असा दावा एरिक्सनने केला आहे.
नवी दिल्ली : प्रमुख दूरसंचार कंपनी एरिक्सनच्या एका रिपोर्टनुसार, जगभरात 2026 पर्यंत 3.5 अरब 5जी कनेक्शन असतील, तर भारतात 5जी कनेक्शनची संख्या ही जवळपास 35 कोटी इतकी असेल.
एरिक्सनचे नेटवर्क अधिकारी (दक्षिण पूर्व आशिया, ओशिनिया आणि भारत) प्रमुख नितीन बंसल यांनी सांगितले की, जर स्पेक्ट्रमचा लिलाव पुढील वर्षाच्या सुरुवातीला झाला, तर भारताला त्याचं पहिलं 5जी कनेक्शन 2021 मध्येच मिळू शकतं. एरिक्सन मोबिलिटी रिपोर्ट - 2020 नंतर जगभरात एक अरब लोक असे असतील, जे जागतिक लोकसंख्येचा 15 टक्के हिस्सा असून त्यांची 5G कव्हरेजपर्यंत पोहोच असेल.
रिपोर्टनुसार, 2026 पर्यंत जगभरातील 60 टक्के लोकसंख्या 5G सेवेचा लाभ घेत असेल. तसेच तोपर्यंत 5G ग्राहकांची संख्या वाढून 3.3 अब्जपर्यंत पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भारतात 5G ग्राहकांची संख्या तोपर्यंत 35 कोटींचा आकडा पार करू शकते. जी भारतातील एकूण मोबाईल वापरकर्त्यांच्या एकूण 27 टक्के इतकी आहे.
बंसल म्हणाले की, 5G सेवांसाठी स्पेक्ट्रम लिलावाच्या घोषणा केलेल्या वेळेनुसार, भारताला त्याचं पहिलं 5G कनेक्शन 2021मध्ये मिळू शकतं. रिपोर्टनुसार, भारतात दर महिन्याला प्रत्येक स्मार्टफोन वापरकर्त्यांचा सरासरी वापर 15.7GB इतका आहे. जी संपर्ण जगभरातील वापरकर्त्यांपैकी सर्वाधिक आहे.
महत्त्वाच्या बातम्या :