नवे वॉलपेपर, इमोजी; व्हॉट्सअॅप युझर्सना चॅटिंगचा नवा अनुभव मिळणार!
यूझर्सचा इंटरेस्ट कायम राहावा यासाठी लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप अर्थात व्हॉट्सअॅप सातत्याने नवे फीचर्स आणतं. आता लवकरच युझर्सना चॅटिंगचा नवा अनुभव मिळणार आहे. कारण व्हॉट्सअॅपमध्ये अॅडवान्स्ड वॉलपेपर आणि इमोजी येणार आहेत.
मुंबई : जगभरातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप अर्थात व्हॉट्सअॅप (WhatsApp) लवकरच नवे फीचर्स आणणार आहे. यूझर्सचा इंटरेस्ट कायम राहावा यासाठी कंपनी सातत्याने नवे फीचर्स आणत असते. व्हॉट्सअॅपमध्ये डिसअपिअरिंग मेसेज, शॉपिंग बटण यांसारखे फीचर्स आधीच जाहीर झाले आहेत, जे लवकरच युझर्सना वापरता येणार आहेत.
हे नवे फीचर्स येणार! आता व्हॉट्सअॅपमध्ये अॅडवान्स्ड वॉलपेपर्स, नव्या इमोजी आणि रीड लेटर सारखे नवे फीचर्सही येत आहेत. अॅडवान्स्ड वॉलपेपरद्वारे युझर्स विविध चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर सेट करु शकतात. यासाठी कंपनी आपल्या व्हेकेशन मोड फीचरला रीड लेटर फीचरने रिप्लेस करणार आहे.
आता यासाठी युझर्सना 61 नवे आणि अतिशय शानदार वॉलपेपरचे ऑप्शन्स मिळणार आहेत. तर WABetaInfo ने वॉलपेपरच्या डिझाईनची लिस्टही शेअर केली आहे, ज्यात वॉलपेपर पाहताय येऊ शकतात.
युझर्स 32 नवे ब्राईट वॉलपेपर्स, 29 नवे डार्क वॉलपेपर, कस्टम वॉलपेपर आणि सॉलिड कलरनुसार सिलेक्ट करु शकतात. जर तुम्ही जुना वॉलपेपर सिलेक्ट करायचा असल्यास तो WhatsApp Archive मधून निवडू शकता.
कोणकोणते नवे इमोजी? याशिवाय कंपनी rollerskates, Bison, Black Cat, Sea Lion, Lungs, Heart, teapot, Green Olives, Quill यांसारखे नवे इमोजी आपल्या प्लॅटफॉर्मवर अॅड करण्याच्या तयारीत आहे.
व्हॉट्सअॅपने नुकतंच अपडेट रोलआऊट केलं होतं, ज्यात काही फीचर्स समोर आले होते. अँड्रॉईड आणि iOS दोन्हीवर यूजर्झना ग्रुप्स किंवा चॅट्सचे नोटिफिकेशन्स कायम म्यूट करण्याचा पर्याय मिळाला आहे. जवळपास प्रत्येक युझरच्या व्हॉट्सअॅपमध्ये अनेक ग्रुप्स असे असतात ज्यामध्ये इच्छा नसूनही राहावं लागतं. यामध्ये फॅमिली ग्रुप्सपासून काही कामकाजाच्या ग्रुपचाही समावेश असतो. असे ग्रुप्स आता कायम म्यूट केले जाऊ शकतात आणि त्यामध्ये येणारे नको असलेले नोटिफिकेशन्स आता तुम्हाला त्रास देणार नाहीत.