एक्स्प्लोर
लेनोव्होच्या 35 हजार स्मार्टफोनची केवळ 15 मिनिटात विक्री

नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर लेनोव्होच्या 'k6 पॉवर' या मॉडलचे केवळ 15 मिनिटात 35 हजार स्मार्टफोन विकले गेले, अशी माहिती फ्लिपकार्टने दिली आहे. हा फोन लाँच करुन केवळ 7 दिवस झाले आहेत. या सात दिवसात तब्बल 17 लाख फोन्सची विक्री झाली आहे.
या फोनची विशेषता म्हणजे यामध्ये 4,000mAh एवढ्या दमदार क्षमतेची बॅटरी आहे. शिवाय 5 इंच आकाराची स्क्रीन, 430 स्नपड्रॅगन ऑक्टाकोअर प्रोसेसर, 3 GB रॅम, 32 GB इंटर्नल स्टोरेज देण्यात आलं आहे.
यामध्ये 13 मेगापिक्सेल रिअर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सेलचा फ्रंट फेसिंग कॅमेरा देण्यात आला आहे. फिंगर प्रिंट सेन्सरसह डॉल्बी ATMOS ऑडिओ सपोर्टिव्ह आणि 4G VoLTE असे फीचर्स देण्यात आले आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्राईम
कोल्हापूर
भारत
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
